Dilip Walse-Patil टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'त्या' वेब सिरीजवर आता बंदी घालणार; गृहमंत्री दिलीप वळसे यांची माहिती

महिलांचे अश्लिल चित्रण होत असलेल्या वेब सिरीजवर बंधने घालण्यावर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

महिलांचे अश्लिल चित्रण होत असलेल्या वेब सिरीजवर बंधने घालण्यावर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमधील देहप्रदर्शन आणि इतर दृश्यांवर बंधने घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी पाऊल उचलले असल्याचेही ते म्हणाले. गृह विभागाच्या चर्चेस उत्तर देतांना गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते.

वेब सिरीजच्या माध्यमातून महिलांचे अश्लिल चित्रण होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. या संदर्भात विधानसभेत बोलताना वळसे पाटील म्हणाले, ओटीटीप्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह वेब सिरीजवर केंद्रीय प्रसारण विभागाशी बोलून बंदी घालण्याबाबत महत्त्वाचे पाउले उचलली जातील पण महाराष्ट्र पोलिस याबाबत कारवाई करत असल्याचेही ते म्हणाले.

शक्ती विधेयकाबाबतही दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले. शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडे गेले असून राष्ट्रपतीकडून या विधेयकाला मान्यता‍ मिळाल्यानंतर या विधेयकाच्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असे वळसे पाटील म्हणाले. सोबतच बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी तरतूदी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT