devendra fadnavis comment on aurangzeb social media crime offence Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide: भिडेंवरुन विरोधक सभागृहात भिडले! फडणवीसांनी काढला सावरकरांचा मुद्दा

विधानसभेत आज काँग्रेसचे नेते संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह विधानांवरुन आक्रमक झाले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : काँग्रेसचे नेते संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह विधानांवरुन आज विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भिडेंवर कारवाईची मागणी केली, त्यावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंवर कारवाई होईल तशी 'शिदोरी'वरही होईल, असा इशारा दिला. (Action will be taken against Sambhaji Bhide like Shidori Mouthpiece of Congress says Fadnavis)

संभाजी भिडे विकृत व्यक्ती असून वारंवार ते महापुरुषांविरोधात विधान करत आहेत. त्यामुळं त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली. यावर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिलं. ते म्हणाले, "संभाजी भिडेंनी अमरावतीत आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावलं आणि त्यातील आशयावरून काही कमेंट केल्या.

ही दोन पुस्तके डॉ. एस. के. नारायणाचार्य व डॉ. घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या पुस्तकातील मजकूर भिडेंनी त्यांच्या सहकाऱ्यामार्फत उधृत केला. पण या प्रकरणी अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोकाअंतर्गत ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे" (Marathi Tajya Batmya)

भिडे आम्हाला गुरुजी वाटतात

आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात, त्यांचं नाव गुरुजी आहे. संभाजी भिडेंना नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे, त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात जे व्हायरल होतंय त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येतील, असं अमरावती पोलिसांनी सांगितल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. (Latest Marathi News)

तर शिदोरीवर गुन्हा दाखल होईल

कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कुणीही अवमानकारक वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांशी बहुजन समाजाला जोडतात. तरीही त्यांना महापुरुषांवर असं वक्तव्य करण्याचा कुणीच अधिकार दिलेला नाही. तसा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे असं करणाऱ्यांवर कारवाई होईल. त्याचवेळी सावरकरांवर आक्षेपार्ह विधान केलं जात आहे.

काँग्रेसचं मुखपत्र 'शिदोरी' म्हणतं की सावरकर माफीवीर, समलैंगिक होते. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या 'शिदोरी'वर ही गुन्हा दाखल करण्यात यईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT