महाराष्ट्र बातम्या

'वाझे प्रकरणाची सर्व सूत्रे हलत होती परमबीर सिंग यांच्याच कार्यालयातून'; समोर आली धक्कादायक माहिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः सचिन वाझे (Sachin waze case) प्रकरणी सर्व सूत्रे ही तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याच कार्यालयातून हलविली जात होती, असे मुंबई पोलिस आयुक्तालयाने (Mumbai police) गृहसचिवांना सादर केलेल्या गोपनीय अहवालातून समोर येत आहे. (actions taken from Parabir Singh office in sachin vaze case said secret report)

शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्याने अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता, पोलिस आयुक्तालयाच्या गोपनीय अहवालात वाझे हा मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करीत होता, असे म्हटले आहे.

सचिन वाझेच्या पुनर्स्थापनेचा निर्णय पोलिस आयुक्तालयातील निलंबन आढावा समितीत घेण्यात आला. वाझेची पदस्थापना सशस्त्र पोलिस दलात करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसांत त्याला गुन्हे गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती देण्यात आली. तो शिस्तपालन न करता थेट पोलिस आयुक्तांनाच रिपोर्टिंग करीत होता. महत्त्वाच्या बिफ्रींगच्या बैठकीला तो हजर असायचा. कार्यालयात अत्यंत महागड्या लक्झरी गाड्या घेऊन यायचा. तत्कालीन सहपोलिस आयुक्त यांनी गुन्हे शाखेतील बदलीला विरोध दर्शवला होता. तरीही परमबीर सिंग यांनी त्याच्या नियुक्तीसाठी दबाव टाकल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्यासमोर स्फोटके सापडल्यापासून या प्रकरणाला सुरुवात झाली. अनेक वर्षे निलंबित असलेला सह पोलिस निरीक्षक सचिन वाझे एकदम प्रकाशझोतात आला. त्याची नियुक्ती कोणी केली, पोस्टिंग कोणी दिली, त्याची रिपोर्टिंग कुणाकडे होती, आदी प्रश्नांची उत्तरे नव्या पोलिस आयुक्तांकडून मागविण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालात ही सर्व सूत्रे तत्कालीन पोलिस आयुक्तांकडूनच हलत होती, असे म्हटले आहे.

माझ्याविरुद्ध षडयंत्र

या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी आपली बाजू मांडणारे सर्व दस्तावेज न्यायालयात सादर केले आहेत. सीबीआय तपासाला सर्व सहकार्य केले. सुमारे पंचवीस वर्षे आपण मंत्रिमंडळाचे सदस्य होतो. आजवर एकाही भ्रष्टाचाराचा आरोप आपल्यावर नाही. मी निर्दोष आहे. ते सिद्ध होणारच आहे. हे माझ्या विरुद्धचे षडयंत्र आहे.

(actions taken from Parabir Singh office in sachin vaze case said secret report)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT