मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या गो. ब. देवल स्मृतीदिन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना परिषदेच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पद्मश्री परशुराम खुणे यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटीची घोषणा केली. तसेच नाट्यगृहांची परिस्थिती सुधारायला पाहिजे. त्यासाठी परिषदेने केलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले. तसेच राज्यातील सर्व नाट्यगृहे याचे सर्व कामकाज हे एका छताखाली झाले पाहिजे यासाठी सनदी अधिकारी नेमून त्यासाठी निधी दिला जाईल.
नाट्य संमेलन भव्यदिव्य झाले पाहिजे यासाठी सरकार कडून कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. नाट्य क्षेत्रातील कोणतीही कामे रखडली जाणार नाहीत, ती तातडीने तडीस नेले जातील असेही आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.
यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, अभिनेते मोहन जोशी, खासदार राहुल शेवाळे, परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्वस्त गिरीश गांधी, शशी प्रभू, भाऊसाहेब भोईर, नरेश गडेकर, सतीश लोटके, अशोक हांडे, कार्यवाह अजित भुरे, सहकार्यवाह सुनील ढगे, विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वामन पंडित संपादित ' रंगवाचा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले,राज्यातील नाट्य गृहांची परिस्थिती सुधारायला पाहिजे. परिषदेच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. राज्यातील रसिक प्रेक्षक कलावंतांना दाद देणारा आहे. मराठी रंगभूमी हे सांस्कृतिक वैभव आहे. कलावंतांनी कलेच्या माध्यमातून सेवा केला आहे. रंगभूमी संचित आणि वैभव आहे. राज्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात घेतले जाते मोठ्या आदराने बोलतात त्यावेळी उर भरून येतो समाधान वाटते. अनेक स्थित्यंतरे आली पण आपल्या लोकांनी मराठी रंगभूमी वाढवली. जेजे आवश्यक आहे,ते सरकारकडून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
मोहन जोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मी सगळ्या कलावंतांचा ऋणी आहे, तुमच्याकडून मला शिकायला मिळाले. बॅक स्टेज कलाकार यांचीही मला मदत मिळाली. रसिक प्रेक्षक, माझे कुटुंबियांच्या मदतीमुळे मला कार्य करता आले.तर वंदना गुप्ते म्हणाल्या ही रंगभूमी अशीच चालू राहू दे मला अजून खूप नाटके करायची आहेत.
दरम्यान, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण नाट्य गृह हे ३ वर्षे बंद होते.आमच्या टीमने ते सुरू करण्यासाठी काम पूर्ण केले, त्यामुळे या नाट्यगृहात आलो आहेत.आज परिषदेला ११८ वर्षे झाले आहेत. २८ हजार सदस्य असल्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.