Adhik Shravan Maas esakal
महाराष्ट्र बातम्या

Adhik Shravan Maas : दर अडीच वर्षांनंतर का येतो अधिक मास, काय आहे त्याचं महत्व? जाणून घ्या..

पंचांगानुसार ३२ ते ३३ महिन्यांनी ‘अधिक मास’ (Adhik Maas) येत असतो.

सकाळ डिजिटल टीम

देवशयनी एकादशीला (आषाढी) चातुर्मासाला सुरुवात झाली असून, त्यातच श्रावण हा अधिक मास आल्याने शास्त्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Adhik Shravan Maas 2023 : येत्या सोमवारी (ता. १७) दीप अमावास्येनंतर (Deep Amavasya) मंगळवारपासून अधिक श्रावणमासाची (Shravan Maas) सुरुवात होत आहे. १६ ऑगस्टपर्यंत अधिक मास असेल. देवशयनी एकादशीला (आषाढी) चातुर्मासाला सुरुवात झाली असून, त्यातच श्रावण हा अधिक मास आल्याने शास्त्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पंचांगानुसार ३२ ते ३३ महिन्यांनी ‘अधिक मास’ (Adhik Maas) येत असतो. याला ‘पुरुषोत्तम मास’, ‘मल मास’ असेही म्हटले आहे. चांद्रमास ३५४ दिवसांचा, तर सौर मास हा ३६५ दिवसांचा असतो. त्यामुळे वार्षिक कालगणनेत होणारा ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर अडीच वर्षांनंतर अधिक मास येतो.

मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांना जोडून अधिकमास येत नाही. अधिकमासाची देवता ‘पुरुषोत्तम’ म्हणजेच भगवान विष्णू मानली जाते. तीस अधिक तीन (३०+३ (३३) या संख्येने दानधर्म करतात. अधिकमासात दररोज उपवास, फक्त एकच वेळा भोजन किंवा मौनव्रतही पाळतात.

आधुनिक काळात श्रमदान, नेत्रदान, रक्तदान, देहदान करणे अधिक इष्ट, तर विद्यादान हे तर सर्वात संयुक्तिक आहे. हिंदू सणवार व विविध व्रत-उपासना याद्वारे संस्कृतीचे दर्शन घडते. वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि मुख्यत्वे नैतिकता गुंफलेली आहे. याच उद्देशाने या अधिकमासाकडे चोखंदळपणे पाहणे आवश्यक आहे.

अधिक मासात दानाला महत्त्व

अधिक मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. या मासात देवाची पुनर्प्रतिष्ठापना करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन हे संस्कार करावेत. काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. महादाने, अपूर्व देवदर्शन, गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतन व्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठापना करू नये, असेह शास्त्रात सांगितले आहे.

नीज श्रावण १७ ऑगस्टपासून

दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ तर कमीत कमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. २०२० मध्ये आश्विन, २०२३ मध्ये श्रावण, तर २०२६ मध्ये ज्येष्ठ हा अधिक मास असेल. यंदा नीज श्रावण मास १७ ऑगस्टला सुरू होत असून, श्रावणात येणारे सण नीज श्रावणातच साजरे करावेत.

अधिक मासात निस्पृह भावनेने केलेले कर्म फलप्रद ठरते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास अशीही नावे आहे. श्री विष्णुंचे दुसरे नाव पुरुषोत्तम आहे. मल या शब्दाचा अर्थ उर्वरित, शिल्लक राहिलेला असा अर्थ असून चांद्रमास व सौरमास यांची सांगड घालून तयार झालेला उर्वरित, शिल्लक महिना म्हणून त्याला मल मास म्हटले आहे.

- गणेशशास्त्री शुक्ल (गुरुजी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT