देशात नुकतीच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले. तर इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेल्या काँग्रेसलाही यंदा गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत चांगली कामगिरी करता आली.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मानही मिळवला.
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी आदिनाथ साळवी यांनी 13 एप्रिल रोजी झालेल्या ज्योतिष अधिवेशनात यंदाच्या लोकसभा निवडणुकीसंबंधी काही अंदाज वर्तवले होते. त्यांचे हे सर्व अंदाज बरोबर आल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले.
13 एप्रिल रोजी झालेल्या ज्योतिष अधिवेशनात आदिनाथ साळवी यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले होते. याचबरोबर बारामतीमधून सुप्रिया सुळे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि शिरूरमधून अमोल कोल्हे विजयी होतील असेही त्यांनी सांगितले होते.
4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अदिनाथ साळवी यांची सर्व भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे साळवी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
दरम्यान साळवी यांची भाकिते खरी ठरण्याची ही पहिलीच वेळ नाही. साळवी यांनी 12 जानेवारी 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होतील असेही भाकीत वर्तवले होते.
पुढे मे 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी यूपीएच्या पाठिंब्यावर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. यानंतर 2009 मध्येही त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.