Aditya Thackeray and cm eknath shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : खोटे बोला, पण रडून बोला ही शिंदेची सवय

कोल्हापूर येथे शिवसेना शिंदे गटाचे शनिवारी महाअधिवेशन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. यावेळी भावनिक होत त्यांचे डोळेही पाणावले.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - खोटे बोला पण रेटून बोला हा भाजपचा कानमंत्र होता. पण आता नवीन फॅशन आली आहे, खोटे बोला पण रडून बोला असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे युवाप्रमुख अदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शहरात जोरदार प्रतिउत्तर दिले. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही रडारड नवीन नाही. काही झाले की अश्रू गाळायचे आणि हवे ते मिळवायचे ही त्यांची जुनीच सवय असल्याचे अदित्य ठाकरे म्हणाले.

कोल्हापूरच्या सभेतही मुख्यमंत्र्यांनी रडत आपण पती, मुलगा, पिता म्हणून अपयशी ठरलो असे सांगितले. पण तुम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही अपयशी मानतो व पुढे जाऊन तुम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणूनही अपयशी ठराल, असा घाणाघात अदित्य ठाकरे यांनी केला.

कोल्हापूर येथे शिवसेना शिंदे गटाचे शनिवारी महाअधिवेशन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. यावेळी भावनिक होत त्यांचे डोळेही पाणावले. त्यानंतर लगेचच रविवारी सायंकाळी शिवसेना उद्वधव ठाकरे गटाचे युवाप्रमुख, माजी मंत्री अदित्य ठाकरे ठाण्यात शाखाभेटीसाठी आले. घोडबंदर मार्गावरील आनंदनगर शाखेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी एका सभेचेही आयोजन करण्यात आले. सभेत ठाणेकर शिवसैनिकांना साद घालत अदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलेच पण पलटवारही केला. जमलेली गर्दी पाहून गद्दार जरी गेले असले तरी ठाणे ही अजूनही शिवसेनेचेच आहे, यावर खात्री पटते असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार घेताना अदित्य ठाकरे म्हणाले की, हल्ली नवीन फॅशन झाली आहे आपल्या राज्यामध्ये, खोटे बोला पण रडून बोला. आधी भाजप बोलायची खोटे बोला पण रेटून बोला. आता शिंदे गट बोलतो खोटे बोला पण रडून बोला. त्यासाठी कालचे अधिवेशन होते. वास्तविक शिंदे यांना रडत पाहण्याची आपल्याला सवय आहे, असेही अदित्य ठाकरे म्हणाले.

ज्या पक्षाने, कुटुंबाने, व्यक्तिने तुम्हाला सर्वकाही दिले, त्याच व्यक्तीचा बाप, पक्ष, चिन्ह तुम्ही चोरायला निघालात. पण दोन गोष्टी कधीच पुसल्या जाणार नाहीत. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि तुमच्या माथ्यावर असलेला गद्दारीचा डाग कधीच पुसला जाणार नाही असे अदित्य ठाकरे म्हणाले.

२०२२ ची आठवण आणि नक्कल

ठाकरे कुटुंबामध्ये नक्कल करण्याचा असलेला गुण अदित्य ठाकरे यांच्यामध्येही आज दिसला. कल्याण विधानसभा निवडणुकच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले राजिनामा नाट्याचे नक्कल त्यांनी यावेळी करून दाखवली. यावेळी त्यांनी उल्हासनगर, ठाणे, कल्याणमध्ये निवडणुकांच्यावेळी शिंदे कसे रडायचे व हवे ते मिळवायचे हे सांगितले. इतकेच नव्हेतर मे २०२२ मध्येही असे ते मातोश्रीवर रडले.

आपल्यामागे ईडी लागली आहे, भाजपसोबत युती करा अशी विनवणी त्यांनी केली. आणि ठिक एक महिन्याने ते भाजपच्या सोबतीने ते घटनाबाह्य अवकाशी मुख्यमंत्री झाले असा अदित्य यांनी आरोप केला. इतके सर्व मिळूनही ते अजून रडतच आहेत.

दर अमावस्या, पौर्णिमेलाच हे शेती करायला का जातात

मुख्यमंत्री स्वताला शेतकर्‍याचा मुलगा म्हणतात. पण यांनी शेती कधी केली. दोन बंगले कधी बांधले. ज्या गावचा ते पत्ता सांगत आहेत, तिथे आधी किती जमिन होती आणि आता किती आहे. मग असे कोणते पिक ते शेतात लावतात जे इतके भरभराट झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या गावात जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही पण हेलिपॅड असे सांगत हे शेतीसाठीपण अमावस्या किंवा पौर्णिमा शोधतात. त्यामागे काय गुपीत आहे, असा टोलाही अदित्य ठाकरे यांनी लावला.

ही निवडणूक देशाच्या संरक्षणासाठी

येणारी निवडणूक केवळ लोकसभा, विधानसभेसाठी नाही, गद्दारांना अद्दल घडवण्यासाठी नाही तर जे आज देश विकायला निघाले आहेत त्यांच्या विरुद्ध आहे, देशाचे, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे. असेही यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले. २०२२ मध्ये भाजपने शिवसेना तोडली. २०२३ मध्ये राष्ट्रवादी फोडली. २०२४ मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राला गाजराशिवाय काही मिळाले नाही.

कारण या सरकारवर कुणीही विश्वास ठेवत नाही. आतापर्यंतच्या सर्व्हेमध्येही आपणच पहिल्या क्रमांकावर आहोत. म्हणून हे ठाणे, मुंबइसह इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. तुमच्यात हिम्मत असेल तर आमदारकी, मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्या. तुमच्याच मतदारसंघातून मी उभा राहतो. असे पुन्हा आव्हान अदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT