Aditya Thackeray News esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागं पडतोय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

सध्याचं घटनाबाह्य सरकार असून मुख्यमंत्री देखील घटनाबाह्य आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्याचं घटनाबाह्य सरकार असून मुख्यमंत्री देखील घटनाबाह्य आहेत.

Aditya Thackeray News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर (Measles Outbreak In Mumbai) या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रामुख्यानं लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये गोवर आजाराचं प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, राज्यात गोवरमुळं 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, राज्य सरकार यावरती कोणत्याही उपाय योजना करताना दिसत नाही. आम्ही कोविडच्या काळात जसं हाताळलं होतं, तसं या सरकारकडून होताना दिसत नाही, असा हल्लाबोल ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

सध्याचं घटनाबाह्य सरकार असून मुख्यमंत्री देखील घटनाबाह्य आहेत. हे खोके सरकार आहे. या सरकारचा महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्लान आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागं पडतोय. कोणत्याही खात्याशी संबंध नसलेले उत्तर का देतात, मुख्यमंत्री का समोर येत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांना पदमुक्त करायला हवं होतं; पण तसं घडलं नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT