मुंबई: टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं एक इंजिन फेल झाल्याने राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांचे हाल होत असताना वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यानंतर आता टाटा एअरबसच्या पाठीमागे लागा असे सांगितले होते, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा असं सांगितलं होतं. पण उद्योग जगातील चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रतून निघून गेला आहे. पहिला प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन, यासाठी ऑगस्ट पर्यंत बैठका चालल्या सप्टेबंरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला, दुसरा बल्क ड्रग पार्क चार अन्य चार राज्यांना देण्यात आले, पण महाराष्ट्रात आणता आला नाही, हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार होता. मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगर जिल्ह्यात येणार होता. जुलैपासून आरडा ओरडा करतोय तो टाटा एअरबस तर जाऊ देऊ नका, तो देखील हातातून गेला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आपण डबल इंजीनचं सरकार जेव्हा बोलतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा केंद्र सरकारबरोबर आमचं डबल इंजिन व्यवस्थित चाललं होतं. कदाचित हे घटनाबाह्य सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल झालं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इतर राज्यात गेली असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्याप्रमाणेच उद्योजकांना या घटनाबाह्य सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये, महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जात आहे ती चांगली लक्षणे नाहीयेत. एका व्यक्तिच्या गद्दारीमुळे आणि राक्षसी महत्वकांक्षेमुळे आपला महाराष्ट्र हा गेले दोन चार महिने फटका खात पुढे चालला आहे, कायदा सुव्यवस्था, उद्योग, शेतीकडे लक्ष न देता घाणेरडे राजकारण केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.