Aditya Thackeray demanded resignation of Industries Minister over tata airbus c295 transport aircraft project  
महाराष्ट्र बातम्या

Tata Airbus Project: 'आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी...'; आदित्य ठाकरे संतापले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.त्यानंतर आता टाटा एअरबसचा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. दरम्यान तब्बल 22 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली, तसेच आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का? असा सवालही विचारला आहे.

"खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?" असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत

"खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?" असा सवाल विचारत उद्योगमंत्र्यांच्या राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गुजरातच्या वडोदरामध्ये भारतीय हवाई दलाच्या सी-295विमानाच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे.

भाजपनं 'मविआ'लाच धरलं जबाबदार

एअर बस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकल्पासाठी फॉलोअप घेणारं एक तरी पत्र कधी लिहिलं का? सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकार आणि एअरबस यांच्यात एक करार झाला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र तत्कालीन मविआ सरकारने एकही पत्र लिहिलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला गेला होता. तेव्हा मविआने प्रयत्न का केला नाही. हा प्रकल्प गुजरातला जाण्यात मविआचं अपयश असल्याचंही उपाध्ये यांनी म्हटलं. मोठे प्रकल्प राज्यात आणणे मुख्यमंत्र्यांचं काम असतं. मात्र आमचे मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडतच नव्हते, असंही उपाध्ये यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT