Aditya Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांनंतर आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना, दौऱ्यांना वेग

ओमकार वाबळे

हनुमान चालिसा पठणाचा वाद महाराष्ट्रात टोकाला गेल्यानंतर त्यात भाजपने अधिकृतपणे सहभाग घेतला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर आता विरोधीपक्ष शिवसेनेविरोधात आक्रमक झाला आहे. भाजपचं शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या भेटीला गेलं. (Aditya thackeray leaves for Delhi)

त्याचं नेतृत्व सोमय्यांनी केलं. यानंतर ते गृहराज्य मंत्र्यांंनाही भेटले. मात्र, सोमय्यांची दिल्लीवारी संपताच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी दिल्ली गाठली आहे. सोमय्यांनंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. (Aditya Thackeray in Delhi)

राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. (Kirti Somaiya Leaves for Delhi to meet Home Secretary Ajay Bhalla)

आता सोमय्यांनी संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. (Kirit Somaiya Attacked in Mumbai) याआधी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात कॉल झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा अमित शाहांनी घेतला. याव्यतिरिक्त सोमय्यांनी गृहमंत्रालयातील अन्य महत्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

आता या भेटीगाठी संपताच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला कूच केलंय. पर्यावरण विभागाचे काही कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. मात्र, या दरम्यान काही राजकीय चर्चा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

कसा असेल दौरा?

  • आदित्य ठाकरे वर्षावरून निघून सकाळी ११ वाजता विमानतळावर पोहोचणार .

  • दिल्लीत महाराष्ट्र सदनात दुपारी 1 वाजता पोहोचतील

  • राज्य सरकारचा महाराष्ट्र सदनात पर्यावरण विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

  • त्यानंतर पर्यावरण कार्यक्रम (राजधनचा कार्यक्रम), ताज लँड्स एन्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT