Aditya Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

गद्दारी केलेल्या एकनाथ शिंदेंनी वरळी किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

गद्दारांचे सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मूळ भाजप कार्यकर्ते बाजूला करून गद्दारी करणाऱ्यांना मंत्रिपदे मिळत आहेत. त्यामुळे ज्यांनी मेहनत घेतली ते भाजप कार्यकर्ते नाराज आहेत.

ओरोस : राज्यातील जिल्हा परिषदांच्यासुद्धा निवडणुका होऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यात सध्या लोकशाही आहे की नाही, ते समजत नाही, असा टोला युवा शिवसेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

ते जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापित केलेल्या गणरायाचे दर्शन त्यांनी घेतले. काल दुपारी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव (ता. मालवण) येथील घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. राऊत यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.

यावेळी आमदार वैभव नाईक, रुची राऊत, गीतेश राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर उपस्थित होते. तेथेच आदित्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Aditya Thackeray in Sindhudurg Tour

ते म्हणाले, ‘‘राज्यात लोकशाही उरलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. परिणामी जनतेची कामे संथ गतीने सुरू आहेत आणि हे गद्दारांचे सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. मूळ भाजप कार्यकर्ते बाजूला करून गद्दारी करणाऱ्यांना मंत्रिपदे मिळत आहेत. त्यामुळे ज्यांनी मेहनत घेतली ते भाजप कार्यकर्ते नाराज आहेत.

राज्यातील सरकार हे गद्दार, गँगस्टर, बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराचे आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडल्याकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत, ही खेदाची बाब आहे. अनेक योजनांसाठी राज्य सरकार निधीची केवळ घोषणा करत आहेत. प्रत्यक्षात निधी देत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

सरकारच्या दुर्लक्षामुळे चिपी विमानतळाची दुरवस्था

आमचे सरकार असताना जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू झाले; मात्र त्यानंतर आता विद्यमान गद्दार सरकारने या विमानतळाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विमानतळावर रात्री वा पावसाळी लँडिंग होत नाही. याला सत्ताधारी जबाबदार असून, या विमानतळाच्या दुरवस्थेला राज्य सरकारच कारणीभूत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात लढावे

गद्दारी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वरळी किंवा ठाणे मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे आव्हान देखील ठाकरे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT