पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, या हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळं पोटनिवडणूक नको, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान हाच मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुणे शहरात रखडलेल्या कामाचा पाढा राज्य सरकारला वाचून दाखवला आहे. आदित्य ठाकरे यांनी उद्धाटनाला वेळ मिळत नसल्याने रखडलेल्या प्रकल्पांची यादीच दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.
"आता वर्षभरापासून पुण्याला लोकसभेत प्रतिनिधित्व नाही... फक्त महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीला ही जागा गमावण्याची भीती आहे. पण, भाजप पुरस्कृत खोके सरकार सार्वजनिक कामांची आणि नागरिकांच्या सुविधांची तमा देखील बाळगताना दिसत नाही!" असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
"पुण्याचे नवीन विमानतळ टर्मिनल 4 महिन्यांहून अधिक काळ तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे! याच प्रमाणे 3 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले एमटीएचएल, 8 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले दिघा रेल्वे स्थानक, उद्घाटनासाठी प्रलंबित असलेली उरण लाईन, खोके सरकारच्या व्हीआयपींच्या तारखा न मिळाल्याने पुणे नवीन विमानतळ टर्मिनलपासून वंचित राहिले आहे."
"केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून महाराष्ट्रावर इतका अन्याय का होतो? एमव्हीए सरकार बदलल्यानंतर पुण्यातील प्रस्तावित नवीन विमानतळ रखडला आहे. खोके सरकारने पुणे जिल्ह्यातील वेदांत फॉक्सकॉन (MVA ने प्रस्तावित केलेला) प्रकल्प अचानक गुजरातला पाठवला. आणि आता विमानतळाच्या टर्मिनलच्या उद्घाटनाला 4 महिन्यांपासून उद्घाटनाच्या तारखांची प्रतीक्षा आहे."
"पुणे-मुंबईसारख्या शहरांचा केंद्रातील मंत्री आणि राज्य सरकार एवढा तिरस्कार करत असेल तर महाराष्ट्र न्यायाची अपेक्षा कशी करू शकतो? त्यांच्याकडे महाराष्ट्रात उद्घाटनासाठीही वेळ नाही का?" असे आदित्य ठाकरे म्हणाले.
"पुण्यातील वार्षिक आंतरराष्ट्रीय संमेलन म्हणून एमव्हीएने सुरू केलेले पुणे अल्टरनेट फ्युएल कॉन्क्लेव्ह (पीएएफसी) देखील खोके सरकार यांनी बंद केले आहे. महाराष्ट्राच्या पर्यायी इंधन क्षेत्राला आणि पुण्यातील मोठ्या प्रमाणात विकसीत असलेला वाहन उद्योग क्षेत्राला चालना देण्याचा उद्देश होता. महाराष्ट्राची आर्थिक घुसमट करून भाजप पुरस्कृत खोके सरकार काय साध्य करत आहे?" असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.