aditya thackerays security increased stones pelleted on convoy in aurangabad ambadas danve allegations on shinde govt  esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर झालेल्या हल्ल्याची शिंदे सरकाकडून गंभीर दखल; सुरक्षा वाढवली

सकाळ डिजिटल टीम

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान आता अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे. या यात्रेत आता जास्त पोलिस बंदोबस्त असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता.

मिरवणूकीवेळी डीजे बंद करायला सांगितल्याने वाद सुरू झाला. यानंतर आंबादास दानवे आणि आदित्य ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न देखील झाला होता.तसेच काही प्रमाणात गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक ही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत खैरे यांचं भाषण सुरु असताना अज्ञाताने स्टेजवर दगड भिरकावल्याचा प्रकार देखील घडला. यानंतर काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

दानवेंचे गंभीर आरोप

हल्ला करणारे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तर भिमशक्ती-शिवशक्ती एकत्र येऊ नये म्हणून कारस्थान केलं जात आहेत. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT