Bacchu Kadu_Sachin Tendulkar 
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu on Tendulkar: 'हे' तत्काळ बंद करा! बच्चू कडूंचं तेंडुलकरला आवाहन; लिहिलं खुलं पत्र

यासाठी बच्चू कडू यांनी तेंडूलकरला खुल पत्र लिहिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : माजी किक्रेटपटू आणि माजी खासदार सचिन तेंडुलकरला आमदार बच्चू कडू यांनी थेट आवाहन केलं आहे. तेंडुलकरनं जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या गेम्सची जाहिरात करु नये, असं आवाहन कडू यांनी केलं असून यासाठी तेंडुलकरला खुल पत्रही लिहिलं आहे. (Advertise stop Immediately Bachu Kadu appeal to Sachin Tendulkar Wrote an open letter)

बच्चू कडू म्हणतात, "सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. असंख्य चाहते व भारतरत्न असणार्‍या व्यक्तीनं Paytm First सारख्या जुगार चालवणार्‍या गेम्स अॅपची जाहीरात करणं योग्य नाही. माझी महाराष्ट्र शासन आणि सचिन तेंडुलकर यांना विनंती आहे की कृपया या जाहिरातीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी" (Latest Marathi News)

बच्चू कडूंनी लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

पेटीएम फर्स्ट गेम या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंदुलकर करीत आहेत. सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध क्रिकेटर असून भारतात त्यांचे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळं ते करित असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून अनेकांचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आझाद मैदानात आंदोलनही केलेलं आहे. (Marathi Tajya Batmya)

देशात 'या' राज्यात बंदी

पेटीएम फर्स्ट गेम या ऑनलाईन जुगारावर भारतातील आंध्रप्रदेश, आसाम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचलप्रदेश, मेघालय, ओडीसा, तेलंगणा या आठ राज्यांमध्ये पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. भारतरत्न सन्मानानं सन्मानीत झालेल्या व्यक्तीनं अशा प्रकाराच्या जुगाराची जाहिरात करणं लोकांच्या हिताचं नाही. त्यामुळे भारतरत्ननं सन्मानित असलेल्या सचिन तेंडुलकर यांनी भारतातील जनतेचा विचार करून अशा प्रकारच्या जाहिराती करू नयेत ही देशवासियांसाठी त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

महाराष्ट्रातील नव्हेच तर भारताची पुढील पिढी या जुगाराच्या विळख्यातून वाचवायची असेल तर या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी आणि लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी, ही विनंती!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT