Eknath Shinde sakal
महाराष्ट्र बातम्या

Cm Eknath Shinde : म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येकाला परवडणारे घर देणार

मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमध्ये आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र येथील गगणाला भिडलेले घराचे भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमध्ये आपल्या हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र येथील गगणाला भिडलेले घराचे भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तरिही प्रत्येकाला म्हाडाच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याची राज्य सरकारची जबाबदारी असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यासाठी म्हाडाने पूर्ण क्षमतेने काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीन ठाणे शहर, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ३११ घरांची संगणकीय सोडत आज मुंख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये काढण्यात आली. त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. म्हाडाने आतापर्यंत नऊ लाख घरांचे लॉटरीच्या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना वाटप केले आहे.

गिरणी कामगारानाही दर महिन्याला घरांचे वाटप केले जात आहे. त्यामुळेच सामान्यांचा म्हाडावरील विश्वास वाढत चालला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान पुढील वर्षभरात म्हाडासह विविध घटकांच्या माध्यमातून राज्यात एक लाख घरे सर्वसामान्यांना देण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळा स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल, कोकण मंडळाचे मुख्याधिकारी मारोती मोरे आदी उपस्थित होते.

वेळेत घरांचे काम पूर्ण करा

म्हाडाकडून ठिकठिकाणी इमारती बंधल्या जातात. मात्र त्या इमारतींच्या कामा मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा असे निर्देश म्हाडाला दिले. तसेच जे विकासक वेळेत काम पूर्ण करणार नाहीत त्यांना दंड लावा आणि जे वेळेत पूर्ण करून म्हाडाला सूपूर्द करतील त्यांना बक्षीस द्या असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रत्येक वर्षी पाच हजार घरांची लॉटरी

सामान्यांना परवडणा-या किंमतीत घरे देण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. त्यानुसार दरवर्षी किमान चार-पाच हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार असल्याची ग्वाही म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल यांनी दिली. त्यासाठी म्हाडा कालबद्ध कार्यक्रम आखत असून त्यानुसारच घरे दिली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT