pm modi esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं मोदींची तुलना केली रावणाशी; निर्णयाविरोधात जाणार न्यायालयात

पंढरपुरमधील मंदिरे तोडण्यावर भाजपचे माजी खासदार नाराज

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, रावणसारखे मोदी धार्मिक असल्याचा दावा करून मंदिरे नष्ट करत आहेत.

यावर भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "पंतप्रधान मोदी रावणाप्रमाणेच धार्मिक असल्याचा दावा करतात. असा दावा करून मंदिरे पाडण्याचा काम करत आहेत किंवा त्यावर ताबा मिळवत आहेत. उत्तराखंड आणि वाराणसीमध्ये हेच झालं आहे. आता मोदी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळवून पंढरपूरच्या पवित्र स्थळांना नष्ट करण्याची योजना बनवत आहे. हा नरसंहार रोखण्यासाठी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे".

पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपूरमध्ये अहिल्याबाई होळकर आणि बायजाबाई शिंदे यांनी बांधलेली राम आणि कृष्ण ही दोन्ही मंदिरे तोडली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपचे माजी राज्यसभा खासदार नाराज असून त्यांनी कोर्टात जाण्याचा निश्चय केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT