छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत आहे. दरम्यान अशातच भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाला पत्र लिहून माफी मागितली, असं म्हणत सुधांशू त्रिवेदींनी म्हंटलं आहे. यावर राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात राज्याभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ट्विटमद्धे संजय कुटे म्हणतात की, "आम्ही राज्यपालांच्या या वक्तव्याशी कदापि सहमत नसून तीव्र शब्दात याचा निषेध करीत आहोत असं म्हंटलं आहे. तर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मात्र राज्यपालांची बाजू घेतल्याचे दिसून येत आहे.
राज्यपाल यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून निदर्शनं सुरू आहे. या मुद्यावर प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'शिंदे-फडणवीस सरकारचे काम उत्तम पद्धतीने चाललंय. विरोधकांना टीका करण्यासाठी काही मिळत नाही त्यामुळेच त्यांचा स्ट्रटजिकल ड्रामा सुरु आहे. मला वाटत नाही राज्यपालांचा उद्देश छत्रपतींचा अपमान करण्याचा असेल. तो कुणाचाच काळ असा शकत नाही, आज असू शकत नाही आणि उद्याही नाही' असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.