Vishwasrao Peshwa Birth Anniversary esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishwasrao Peshwa : पानिपतानंतर अब्दालीला १ लाख रुपये दिले अन् तेव्हाच मिळाले विश्वासरावांचे पार्थिव...

एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडवून घेतले

सकाळ डिजिटल टीम

Vishwasrao Peshwa Birth Anniversary : पेशवा पिढीतले तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाई यांचा पहिला मुलगा अर्थात विश्वासराव पेशवे. त्यांचा जन्म पुण्यात २ मार्च १७४२ रोजी शनिवारवाड्यात झाला. मार्च १७४९ मध्ये मुंज झाल्यानंतर मे १७५० मध्ये पटवर्धन घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

आपल्या लहानपणापासूनच त्यांना पेशवाईचा कारभार सांभाळण्यासाठीचे धडे दिले जात होते. जो अंबारीत बसे तोच साऱ्यांना दिसे असा गोपीकाबाईंचा अजेंडा होता, नानासाहेब विश्वासरावांना सदाशिव भाऊरावांसोबत युद्धात पाठवत असत.

ऑक्टोबर १७५७ मध्ये औरंगाबाद व सिंदखेडा येथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. त्यावेळी या युद्धात विश्वासराव हजर होते. निजाम अलीसोबत जानेवारी १७६० मध्ये झालेल्या उदगीर येथील लढाईमध्ये सदाशिवराव भाऊंच्या बरोबर विश्वासरावदेखील होते. त्यांनी या युद्धाच्या वेळी हत्तीवर बसून कमालीची तिरंदाजी केली.

पानिपतचे युद्ध मोठे मराठे एकजुटीने लढले तर अब्दालीला हरवणे कठीण नाही अशात त्या युद्धावर विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली साऱ्यांना पाठवावे असा सल्ला गोपिकाबाईंनी नानासाहेबांना दिला.

पानिपतचे युद्ध :

१४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात निघाल्या, तेव्हा विश्वासरावांचे वय अवघे १८ वर्षांचे होते. विश्वासरावांच्या हाती स्वतंत्र अशी दहा हजारांची फौज पानिपतच्या युद्धात होती.

बुऱ्हाणपूर, भोपाळ, सीरोंज, ओर्च्छा, नरवर, ग्वाल्हेरमार्गे मराठी फौजा दिल्लीच्या रोखाने निघाल्या. दिल्लीचा किल्ला मराठ्यांच्या हाती आला.

वडिलांना लिहिलेले असे पत्र

पानिपताला नेलेला साठा संपत होता अशात पेशव्यांकडून साठा मागवण्यासाठी विश्वासरावांनी पत्र लिहिले त्यात त्यांनी लिहिलेले, ‘फौज व खजिना पाठविणे. मी आपल्यासाठी लिहित नाही, माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधु मिळणार नाही.ʼ

विश्वासरावांचा मृत्यू

पानिपतच्या रणभूमीवर १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरू झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते. दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. मात्र याचवेळी तिसऱ्या प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले.

त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते. त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवले. बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले. विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर खचला. सैन्यात पळापळ सुरू झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले. विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला.

अब्दालीने पार्थिव आणले आपल्या छावणीत

पानिपतच्या रणभूमीवर  विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता, तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि बापूजी हिंगणेही कैद झाले. ही बातमी शुजादौल्लास लागल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतले. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले. 

अठरा वर्षांच्या मिशीही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांना हळहळ वाटली. दुराणी शिपायांनी ते पार्थिव पाहून अहमदशहा अब्दाली यास एक विनंती केली की, मराठ्यांच्या राज्याचे हे प्रेत आम्हास द्या, आम्ही त्यात पेंढा भरून ते काबूलास विजयचिन्ह म्हणून नेतो.

मुत्सद्दींनी एक लाख रुपये भरुन आणले पार्थिव परत

गणेश वेदांती व काशीराजा वगैरे मुत्सद्दी लोकांनी एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडवून घेतले. शुजाच्या विनंतीवरून ते त्याच्या छावणीत परत आणून त्याचे शास्त्रोक्तपणे दहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT