Rahul Gandhi and Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi: ऐतिहासिक भेट! पवारांसोबतच्या भेटीनंतर राहुल गांधी ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर जाणार

पवारांनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटणार; विरोधकांच्या भेटीगाठी वाढल्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर आता राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. काल शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली.

राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येण्याची शक्यता आहे. लवकरच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होणार आहे. सावरकर वादानंतर काँग्रेसकडुन एक प्रकारे डैमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे किंवा वक्तव्यांमुळे ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता या भेटीमुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी मजबूत होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी ही भेट होणार असल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्ती मातोश्री येथे येणार आहेत त्यामुळे ही ऐतिहासिक भेट होणार असल्याची चर्चा आहे.

राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी राहुल गांधी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यावर सध्या राहुल गांधी यांनी भर दिला आहे.

जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची नुकतीच राहुल गांधींसोबत भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षांचे ऐक्य हा या भेटीं मागचा मुख्य हेतू होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षांच्या या भेटीगाठी वाढल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल गांधींच्या भेटीनंतर काय म्हणाले शरद पवार?

भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जो विचार मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला, तोच विचार आमचा आहे. पण केवळ विचार करून उपयोग नाही, त्यावर पूर्ण क्षमतेनं काम करण्याची गरज आहे. काही राजकीय पक्ष असे आहेत, ज्यांची विचारधारा आमच्याबरोबर काम करण्याची आहे.

त्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, त्यावर विरोधी पक्षनेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष केंद्रीत केलं तर मार्ग आणखी सोपा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT