zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

कंत्राटी शिक्षक भरतीच्या आदेशानंतर 10 पेक्षा कमी पटाच्या शाळेत वाढले विद्यार्थी! शिक्षणाधिकाऱ्यांसमोर कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा पेच; अपडेट पटसंख्येची मागविली माहिती

दहापेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या पाच हजार शाळांवर २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, काही शिक्षकांनी नवी शक्कल लढवत दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये तीन-चार विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करून पटसंख्या दहापेक्षा जास्त केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहापेक्षा कमी पटसंख्येच्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या पाच हजार शाळांवर २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, काही शिक्षकांनी नवी शक्कल लढवत दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये तीन-चार विद्यार्थ्यांची जुळवाजुळव करून पटसंख्या दहापेक्षा जास्त केली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी देखील आता पेचात सापडले असून त्यांनी आता सध्याची पटसंख्या मागविली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास ६३ हजार शाळा असून त्यापैकी १४ हजार ७८३ शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे. त्यातील चार हजार ८७१ शाळांमध्ये तर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असतानाही तेथील पट दहापेक्षा कमी आहे. इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांची विशेषत: शहराच्या हद्दवाढ भागातील शाळांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.

कमी पट असतानाही अशा शाळांमध्ये दोन-दोन शिक्षक कार्यरत आहेत. दुसरीकडे जास्त पटसंख्येच्या शाळांसाठी शिक्षक कमी असल्याने समानीकरणाचे धोरण त्याठिकाणी लागू करावे लागले आहे. त्यामुळे कमी पटाच्या शाळांवरील एक शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये नेमून त्याठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, आता तेथील परमनंट शिक्षकांच्या नव्या आयडियामुळे कंत्राटी शिक्षक भरतीलाही ‘खो’ बसेल, अशी सद्य:स्थिती आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये अजूनही सात हजार शिक्षकांची पदे रिक्तच आहेत.

चालू पटसंख्येची मागविली माहिती, त्यानंतर कंत्राटी भरतीची कार्यवाही

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमणुकीसंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार या नेमणुका केल्या जाणार आहेत. पण, सध्या त्यातील काही शाळांचा पट चार-पाचने वाढल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भातील माहिती मागवली असून त्यानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमले जातील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

राज्यातील झेडपी शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • ६३,०००

  • १ ते १० पटसंख्येच्या शाळा

  • ४,८७१

  • ११ ते २० पटाच्या शाळा

  • ९,९१२

  • २०पेक्षा कमी पटाच्या एकूण शाळा

  • १४,७८३

पहिल्यांदा समायोजन, नंतर कंत्राटी भरती

सध्या १० पेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. सुरवातीला त्याचा कालावधी एक वर्षाचा असणार असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी त्या उमेदवारांच्या नेमणुका करतील. तत्पूर्वी, कमी पटाच्या (१० पेक्षा कमी) शाळांवरील दोनपैकी एका शिक्षकाचे दुसऱ्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी त्या शाळांचा सध्याचा पट किती याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील आठवड्यापासून कंत्राटी शिक्षक भरतीला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

K. C. Venugopal : पराभव केवळ काँग्रेसचा नसून महाविकास आघाडीचा...के. सी. वेणुगोपाल : काय झाले ते समजत नाही, पराभवावर विचारमंथन करणार

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT