पुणे - शेतीमालाच्या निर्यात व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांसाठी ‘ॲग्रोवन’तर्फे दुबईचा शेतीमाल निर्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. २८ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान आयोजित केलेल्या या दौऱ्यात शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघ तसेच नवउद्योजक सहभागी होऊ शकतात.
भारतीय फळे व भाजीपाल्याची वेगळी चव, गुणवत्ता, वाहतुकीसाठी लागणारा अवघा चार दिवसांचा वेळ यामुळेच भारतीय शेतीमालाच्या आयातीसाठी सर्वात अनुकूल धोरण दुबई शासन राबवते आहे. दुबईतून वाढत असलेली शेतीमालाची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग बनते आहे. हा शेतीमाल दुबईत निर्यात होतोच; पण तेथील आयातदार हाच शेतमाल पुन्हा विविध आखाती देशांसह युरोपातही पाठवतात.
त्यामुळे दुबई आपल्यासाठी उत्तम बाजारपेठ बनली आहे. ‘ॲग्रोवन’च्या दुबई अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांना दुबईतील बाजारपेठा बारकाईने बघता येतील. तसेच, तेथील आयातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी शेतीमाल निर्यातदार, तज्ज्ञ आणि प्रशिक्षक धनश्री शुक्ल या दौऱ्यातील सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत.
अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची दुबईत एक कार्यशाळादेखील होणार आहे. बाजारपेठेची मागणी व अपेक्षा, निर्यातीमधील संधी व जोखीम, कंटेनरची होणारी विक्री, दुबईत कंपनी कशी स्थापन करायची अशा विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती या कार्यशाळेत मिळेल. २८ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान होत असलेल्या या दुबई अभ्यास दौऱ्यासाठी सात महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट स्वतःकडे असणे अत्यावश्यक आहे.
दौऱ्याचे एकूण शुल्क प्रतिव्यक्ती १.२० लाख रुपये अधिक जीएसटी असून त्यात सर्व खर्च समाविष्ट आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी येथे नमूद केलेल्या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुकांनी १७ जूनपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्यांना २२ जून रोजी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
पर्यटन स्थळांना भेटी
या दौऱ्यात दुबईतील पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधीही सहभागींना मिळणार आहे. बुर्ज खलिफा, दुबई फ्रेम, दुबई मॉल, दुबई फ्यूचर अशा लोकप्रिय स्थळांना भेटी आयोजित केल्या जातील.
लिंक - https://forms.gle/wH4By9d6F542HDez7
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.