Ayodhya-Verdict 
महाराष्ट्र बातम्या

अयोध्या प्रकरण : सावधान! आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि मेसेज पाठविला तर...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जमीन मालकीच्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित आहे. त्यादृष्टीने संबंधीत निकालाबाबत व्हॉटस्‌अप, फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर कोणीही आक्षेपार्ह व्हिडीओ, छायाचित्रे एकमेकांना पाठवून धार्मिक भावना भडकवू नयेत, तसे करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रीया व्हॉटसअप, फेसबुकसह इतर सोशल मिडीया, पत्रकबाजीमध्ये टिका टिपण्णी करू नये. सर्व नागरिकांनी विशेषतः सोशल मिडीयाचा वापर करणारे नागरीक, व्हॉटस्‌अप, फेसबुक ऍडमीन यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन दिलेल्या सूचनांचे पालन करावे. संबंधीत सूचनांचे उल्लंघन केल्यास, जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकाविल्यास संबंधित व्यक्ती किंवा समुहाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले आहे. 

आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो, मेसेज पाठविणाऱ्यांची माहिती कळवा 

कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो किंवा संदेश पाठविल्यास नागरिकांनी इतरांना न पाठविता ब्लॉक करावे किंवा डिलिट करावेत. तसेच असे मेसेज पाठविणाऱ्यांची माहिती पुणे पोलिस, सायबर पोलिस ठाणे (020-29710097) यांना तसेच व्हॉटस्‌अप क्रमांक 8975953100 किंवा 8975283100 या क्रमांकावर कळवावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सोशल मिडीया वापरताना या सूचना पाळाव्यात :  

* धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज प्रसारित करू नये. 
* धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देषाने घोषणाबाजी/जल्लोष करु नये. 
* या प्रकरणामध्ये फटाके वाजवू नयेत. 
* मिरवणुका काढू नये, अभिनंदन व निषेधाचे फलक लावू नयेत. 
* जातीय द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने जुने, आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारीत करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT