Ahilyadevi Holkar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ahilyadevi Holkar: अहिल्यादेवींच्या स्मृतीदिनानिमित्त सरकारची मोठी घोषणा! भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार

अहिल्या भवनाची वैशिष्ट्ये काय? यात कुठल्या सुविधा असतील जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्त राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार भारतात पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं 'अहिल्या भवन' उभारण्यात येणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली आहे.

कुठे उभारणार स्मारक?

मानखुर्द इथं जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून अहिल्या भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ४७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तसंच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारलं जाणार आहे. या भवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाचे विविध कार्यालयं एकाच छताखाली येणार आहेत.

स्मारक संकुलाची वैशिष्ट्ये काय?

  1. संकुलात अहिल्याबाई होळकरांचा पूर्णाकृती पुतळा दर्शनी भाग उभारणार

  2. महिलांसाठी समुपदेशन केंद्र असणार आहे.

  3. 200 जणांची क्षमता असलेलं ऑडिटोरियम

  4. महिला आयोग व बालहक्क आयोगाचं कार्यालय असणार

  5. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची एकूण २० कार्यालये

  6. बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालयही असणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT