AIMIM Offer To Mahavikas Aghadi Government e sakal
महाराष्ट्र बातम्या

आमचं एक चाक जोडून चारचाकी बनवा, AIMIM ची महाविकास आघाडीला खुली ऑफर

सकाळ डिजिटल टीम

AIMIM Offer To Mahavikas Aghadi Government : औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (AIMIM MP Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) खुली ऑफर दिली आहे. तुमचं तीन चाकांचं सरकार आहे. त्याला एक चाक जोडून चारचाकी बनवा. आम्हाला सोबत घ्या, अशी ऑफर जलील यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. माझा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, असं त्यांनी राजेश टोपेंना (Rajesh Tope) सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) हे माझ्या भेटीला आले होते. त्यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली. यावेळी एमआयएममुळे उत्तर प्रदेशात भाजपला जिंकता आलं, असं त्यांनी म्हटलं. आमच्यावर नेहमी भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. पण, हा आरोप संपुष्टात आणायचा असेल तर आम्हाला तुमच्यासोबत घ्या, अशी ऑफर महाविकास आघाडीला दिली, असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

भाजप देशात चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे. भाजपने देशाला उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडी करायची असेल तर एमआयएमचा पाठिंबा असेल. पण, यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत. यांना ओवैसींचा एमआयएम पक्ष नको. आम्ही उत्तर प्रदेशात बसपा आणि समाजवादी पक्षासोबत बोलणी केली होती. त्यांना मुस्लिमांचे मत पाहिजे. पण, एमआयएम पक्ष नको होता, अशी टीकाही जलील यांनी केला.

येत्या काळात महापालिका निवडणुका आहेत. त्या निवडणुकीत देखील आम्ही सोबत लढायला तयार आहोत. पण, महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येतेय माहिती नाही. त्यासाठी वरिष्ठांनी पुढकार घ्यावा, असा निरोप राजेश टोपे यांना दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं. आता महाविकास आघाडी सरकार नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, महाविकास आघाडीत शिवसेना हा घटक पक्ष आहे. त्यामुळे एमआयएमला स्थान देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT