Asaduddin Owaisi  Asaduddin Owaisi
महाराष्ट्र बातम्या

मुस्लिमांनी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे - असदुद्दीन ओवैसी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण (Reservation for Muslims) मिळालेच पाहिजे. आरक्षण हा मुस्लिमांचा अधिकार आहे. आरक्षणानेच विकार होईल. हे कोणत्याही मुस्लिम बांधवांनी विसरायला नको. २० टक्के मुसलमान वर्षाला २० हजार कमवतात. तर चार टक्के मुसलमानच पदवीधर झाले आहे. आरक्षणाशिवाय मुस्लिमांचा विकास शक्य नाही (Development is not possible without reservation), असे असुद्दीन ओवैसी म्हणाले.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दावरून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी वक्फ बोर्डाच्या जमिनींना संरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी घेऊन एमआयएमने औरंगाबाद ते मुंबई अशा रॅलीचे आयोजन केले होते. दुसरीकडे मुंबईत मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली होती. तरीही एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आणि सभा पार पडली, हे विशेष...

चांदिवली सभास्थळातून live (एमआयएम सभा)

असदुद्दीन ओवैसी live - ज्यादिवशी भारतातला मुसलमान एकत्र येईल त्या दिवशी सर्व भीतील. आपण जिंकू शकत नाही, हे आपल्या डोकतून काढून टाका. अस केल तरच मुस्लिमांचा विजय शक्य आहे. कोणी मला म्हटल होऊ शकत नाही, तर मी होऊ शकते अस म्हणत होतो. सकारात्मक राहा. एकत्र राहा, एकत्र लढण्याची गरज आहे. त्याशिवाय विकास शक्य नाही. मुस्लिमांनी स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे.

ओमिक्रॉन येईल की नाही हे कोणाला माहिती नाही. मात्र, बुस्टर डोज नागरिकांना द्यायला हवा. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारनचे याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे म्हणत ओवैसी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला केला. मी मुसलमानांना बुस्टर डोज दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील मुसलमानांना न्याय मिळाला तेव्हाच न्याय मिळाल्याचे होईल.

महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे. हा मुस्लिमांचा अधिकार आहे. आरक्षणानेच विकार होणार आहे. हे कोणत्याही मुस्लिमांनी विसरायला नको. २० टक्के मुसलमान वर्षाला फक्त २० हजार कमवतात. चार टक्के मुसलमानच पदवीधर झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली, त्यांच्यावर आम्हाल गर्व आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

थ्री इन वन सरकारला आरक्षणाचा विसर पडला आहे. हायकोर्टाने मुस्लिम आरक्षणाला मान्यता दिली आहे. मात्र, हे सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. ८३ टक्के नागरिकांकडे जमीन नाही. कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. एक आणि दोन रूमच्या खोलीत राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या मोठी आहे. चार आणि पाच खोल्यांत राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या सरकारकडे नाही.

मुसलमानांना शिकायचे आहे. मात्र, त्यांना शिकता येत नाही आहे. कारण, त्यांच्याकडे पैसे नाही. मुसलमानांना आरक्षण द्या ते शिकल्याशिवाय राहणार नाही. सेक्युलॅरिझमुळे मुसलमानांना काय मिळाले. सेक्युलॅरिझमुळे आरक्षण मिळेल का? काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेने हात मिळवला आहे. शिक्षित मुसलमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तरीही आरक्षण मिळालेले नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे हृदय फक्त मुसलमानांसाठी धडकते.

केव्हापर्यंत मुस्लिम धोका सहण करीत राहील. आरक्षण भेटल नाही, नाही भेटल. मुसलमानांना काहीही भेटल नाही. मुसलमानांनाही आरक्षण भेटल पाहिजे. भारताच्या संविधानात आरक्षणाबद्दल लिहिले आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुसलमान मागे असतानाही आरक्षण दिले नाही. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिले मात्र, मुसलमानांना नाही.

सरकार तिरंगेच्या विरोधात गेली आहे. तिरंगा रॅली काढली त्यात अडचण काय आहे. मुख्यमंत्री लवकरात लवकर ठीक व्हावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मिळून काम केल तर विजय आपलाच आहे. टीम वर्क म्हणून काम केल तर महाराष्ट्रातील कोपऱ्या कोपऱ्या आपण झेंडा फळकवू शकू. मी ज्यांच ज्यांच नाव घेतलं त्यांची परीक्षा सुरू होईल.

इम्तियाज जलील live - अखेर मी मुंबईत आलोच. ही फक्त सुरूवात आहे. आंदोलन बाकी आहे, रॅलीदरम्य़ान अनेकदा पोलीसांनी अडवलं. मराठी बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. मी मुंबईत येऊ नये यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. मला अडविण्यासाठी पोलीसांवर दबाव देत आहेत. निवडणुकांपुरतीच जनतेची आठवण येते. आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहणार. राज्यकर्ते आम्हाला घाबरले आहे. तुमच्यासाठी मी लढत राहणार.

राज्यकर्ते आम्हाला घाबरले आहे

आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, मला अडविण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. अन्याय झाल्यास आम्ही गप्प का बसायंच? रॅलीत आम्हाला झेंडा काढायला लावला. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे.

वारिस पठाण live - राज्य सरकारला आरक्षण द्यायचं नाही. आम्हाला ५ % आरक्षण मिळालंच पाहिजे. आमच्या तिरंगा रॅलीला अनेकदा अडवलं. आमचा लढा सुरूच राहणार. आरक्षण का देत नाहीत? कोर्टाच्या निर्णयानंतरही आरक्षण दिले नाही.

वारिस पठाण live -मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि वफ्फ बोर्डाच्या (Waqf Board) जागांच्या संरक्षण या मागणीसाठी एमआयएमकडून शनिवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मुंबईत दाखल झाल्यानंतर सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करताना वारीस पठाण (Waris Pathan) यांनी पाच वर्षांपूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील अखेर मुंबईत दाखल झाले... मानखुर्द, वाशी, खारघरमध्ये पोलिसांकडून समजवण्याचा प्रयत्न केला गेला... मात्र इम्तियाज जलील हे मोर्चा काढण्यावर ठाम होते... तर मानखुर्दमध्ये जलील यांच्याकडे असलेला तिरंगा झेंडा काढण्यास सांगण्यात आला...

मात्र तरीही जलील तिरंगा झेंडा घेऊनच जाणार यावर ठाम होते... इम्तियाज जलील हे मुंबईच्या चांदिवलीतील सभास्थळी अखेर दाखल झाले... आणि त्यांच्या सभेला सुरुवात होईल... तर यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित राहणार असून ओवेसी आता काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT