Air Pollution pregnant women trouble 
महाराष्ट्र बातम्या

प्रदूषण जीवसृष्टीसह मानवासमोरील मोठे आव्हान

गर्भवतींसह भावी पिढ्याही संकटात, १२ झोपडपट्ट्यांमधील सर्वेक्षणातून वाजली धोक्याची घंटा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जग वेगाने बदलतेय...तसे प्रश्‍नही बदलत आहेत. अशा काळात प्रदूषण अत्यंत चिंतेचा विषय बनला. शहर सीमेवरील औद्योगिक क्षेत्र, वाढते स्थलांतर, सोयीसुविधांचा अभाव यामुळे वाढत्या प्रदूषणाने वर्तमानच नाही तर भावी पिढ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. प्रदूषण कोणतेही असो, नुसतेच जीवघेणे ठरत नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी संकटाची योजना करून ठेवते. गर्भवती माता प्रदूषित हवेत श्वास घेत असल्यास ती अनारोग्याच्या खाईत पडेल हे निश्चित. तिच्यापोटी बाळ व्यंगासह जन्म घेऊ शकते. अथवा दूषित वायुमुळे बाळाचा गर्भातच मृत्यू होऊ शकतो. हा भविष्यातील धोका वेळीच ओळखून आजच प्रदूषण रोखण्यासाठी पाऊले उचलण्याची, पर्यावरण संवर्धनाची गरज आहे.

‘वॉरियर मॉम्स आणि सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या संस्थांनी नुकतेच नागपुरातील खामला वस्ती, डिप्टी सिग्नल, काचीपुरा, आदिवासीनगर, न्यू वैशालीनगर, सुरेंद्रगड, भांडेवाडी, भानखेडा, शिवाजी नगर, जयताळा, इंदिरानगर आणि बाळाभाऊ पेठ या १२ झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण केले. या झोपड्यांमध्ये आजही चूल वापरणाऱ्यांचे प्रमाण ४३ टक्के आहे. येथील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर दुरगामी परिणाम होत असल्याचा अहवाल समोर आला होता. यात ८१ टक्के महिलांना खोकल्याचा तर ६५ टक्के महिलांना चुलीच्या धुराने डोळे चुरचुरण्याचा त्रास होत असल्याचे विदारक वास्तव उघड झाले होते. शिवाय नागपुरातील कोराडी, कामठी, बुटीबोरी आणि हिंगणा आदी परिसर सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यांना प्रदूषणाचा सर्वाधिक धोका आहे.

खास करून घरात बाळ वा लहान मुलं असते अशी घरे त्या बाळासाठी असुरक्षित ठरतात. मात्र काही टिप्स वापरून बाळाचे रक्षण करता येते. शहरात दरवर्षी ५८ हजारावर प्रसूती होतात. प्रदूषणाचा गंभीर परिणाम होतो. नागपुरात जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत ० ते १ वर्षाच्या १४४० चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले. यात काही प्रमाणात प्रदूषण कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ खासगीत सांगतात.

गर्भातील बाळावर होणारा परिणाम

वायू प्रदूषणाचा धोका आईच्या मार्फत गर्भातील बाळापर्यंतही पोहोचू शकतो. हार्वर्डच्या एका संशोधनानुसार गर्भवतींनी तिसऱ्या तिमाहीमध्ये अधिक दूषित वातावरणात श्वास घेतल्याने बाळाला मेंदूचा विकार होण्याचा धोका बळावतो. गरोदरपणात अस्थमामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. किडनीची कार्यक्षमता मंदावते. वेळेवर उपचार न केल्यास अस्थमामुळे बाळाला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. यामुळे मुदतपूर्व प्रसूतीचाही धोका आहे. याचा मोठा धोका म्हणजे बाळ गर्भातच मृत होऊ शकतं.

अहवाल काय सांगतो ?

नागपुरातील १२ झोपडपट्ट्यांमध्ये ४५ टक्के महिला अजूनही लाकूड, पीक कचरा, कोळसा, शेण आणि रॉकेल यासारख्या घन इंधनांचा वापर करतात. उघड्या चुलीवर स्वयंपाक करतात. हेच चित्र जागतिक पातळीवर आहे. बांगलादेश, भारत, इंडोनेशिया, मंगोलिया आणि म्यानमार या आशियातील देशांमध्ये जागतिक लोकसंख्येपैकी ६० टक्के महिला स्वच्छ इंधनापासून दूर आहेत. देशातील १.५ अब्ज लोकांकडे स्वयंपाकाच्या स्वच्छ सुविधा नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीद्वारे २०२१ मध्ये झालेल्या संशोधनानुसार वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि श्वसन विकारास हे घटक कारणीभूत ठरतात. ५ ते १० टक्के मृत्यू बायोमास जाळल्यामुळे होतात. स्त्रियांना गर्भधारणेच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागते. मृत बाळाचा जन्म, कमी वजनाचे वजन, गर्भाशयात वाढ मंद होणे आणि धुराच्या सतत संपर्कामुळे बालमृत्यू होतात.

-अंकिता भातखंडे, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नागपूर.

वायू प्रदूषणातील अतिसूक्ष्म कणांमुळे जन्मलेल्या मुलांना अस्थमाची शक्यता आहे. गाडी आणि चुलीचा स्रोत मानला जातो. प्लेसेंटाच्या माध्यमातून भ्रूणच्या प्रवाहात पोहोचते. वायू प्रदूषणामुळे नियोजित वेळेपूर्वी जन्मलेल्या अर्भकांमध्ये कमी वजनाचा धोका वाढतो. वायू प्रदूषण गर्भवती महिलांसाठी घातक आहे. बाळ मृत किंवा व्यंग घेऊन जन्माला येण्याची भीती असते. यामुळे अदृश्य रूपातले प्रदूषणाचे संकट दूर ठेवण्यासाठी गर्भवतीच काळजी घ्यावी. सुरक्षात्मक उपाययोजना करून स्वतःचं आणि बाळाचे आयुष्य सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करावा. घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एयर प्‍यूरिफायरचा वापर करा. आवारात झाडे लावावी. हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपणच सक्रिय प्रयत्न करायला हवेत. पुढच्या पिढीला प्रदूषणाच्या धोक्यांपासून वाचवायचे असेल तर आजच्या पिढीने यासंदर्भात पावले उचलणे गरजेचे आहे.

-डॉ. सुषमा देशमुख, प्रसिद्ध स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, नागपूर.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असा सृष्टीच्या संवर्धनाचा सारासार विचार संत तुकाराम यांनी शेकडो वर्षांपूर्वी आम्हाला दिला. ज्या काळात पर्यावरण बदल, ग्लोबल वार्मिंग सारख्या शब्दांचाही शोध लागला नसताना जगदगुरूंनी वृक्ष वने यांच्याशी आपले अतुट नाते अभंगामधून अधोरेखित केले. एवढेच नव्हेतर आपल्या पूजा-अर्चा, यज्ञादी सोपस्कारांतही दुर्वांपासून ते बेलपत्र, आंब्याची पाने, तुळशी आदी बहुगुणी वनस्पती, झाडांचा उपयोग करून निसर्ग, पर्यावरणाच्या अधिक जवळ राहण्याचा प्रयत्न वैदिक शास्त्रांमधून केल्याचे दिसते. या आध्यात्मिक शिकवणुकीचा पर्यावरण शुद्ध राखण्याशी व प्रदूषण रोखण्याशी संबंध आहे. आज सबंध जग आपल्या पर्यावरणाविषयीच्या आध्यात्मिक विचाराकडे वळताना दिसत आहे. त्यावर आपणही श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. तेव्हाच आपण पर्यावरण शुद्ध राखण्याचा संकल्प सिद्धीस नेऊ शकू.

नागपुरात थर्मल पावर स्टेशन असल्याने जल आणि वायू प्रदूषणाचा फटका बसत आहे. कोराडीसारख्या परिसरात राखेमुळे प्रचंड प्रदूषण वाढले आहे. या पॉवरस्टेशनच्या २५ किलोमीटर परीघातील जनतेची आरोग्य तपासणी व उपचाराची जबाबदारी त्या पॉवर स्टेशनवर असते. गर्भवतींसह पुढे नवजात बाळांना प्रदुषणामुळे श्वसन विकारापासून तर अनेक आजारांचा धोका आहे. कोराडीत बांध फुटल्याने राख पाण्यात मिसळली, यामुळे राखेतील हेव्ही मेटल्समुळे रक्तविकारांचा धोका आहे. प्रदूषणात दुपटीने वाढ झाली असून, शुद्ध आणि स्वच्छ हवेला नागपूरकर मुकत आहेत. या परिसरातील गर्भवतींनी प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क वापरावे.

- सुरेश चोपणे, अध्यक्ष-ग्रीन प्लॅनेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT