Ajay Barskar 
महाराष्ट्र बातम्या

Who is Ajay Baraskar: कोण आहे अजय बारसकर?दीपाली सय्यद विरोधात लढवलेली 'ही' लोकसभा, डिपॉजिट झालं होतं जप्त

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं बारसकर सध्या चर्चेत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले हभप अजय महाराज बारसकर हे कोण आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत. बारसकर यांनी २०१४ मध्ये अभिनेत्री आणि राजकारणी दिपाली सय्यद यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूकही लढवली होती. (ajay baraskar ex supporter manoj jarange maratha reservation contested lok sabha election against actress deepali sayyad)

वैयक्तीक माहिती

अजय महाराज बारसकर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालगावचे आहेत. एका वारकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून सध्या त्यांचं वय ४५ वर्षे आहे. बीएपर्यंतच त्यांचं शिक्षण झालं असून त्यांनी नगरच्या विखे पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही केला आहे. तसचे नगरच्याच सीएसआरडी कॉलेजमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे.

राजकीय वाटचाल

सन २०१४ मध्ये अजय बारसकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना सहाव्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 'बहुजन मुक्ती पार्टी' या पक्षाकडून ही निवडणूक लढवणाऱ्या बारस्करांना ६,००३ इतकी मत मिळाली होती. त्यांच्या वर पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांना ७,१२० इतकी मतं मिळाली होती. दिपाली सय्यद यांना आम आदमी पार्टीनं उमेदवारी दिली होती. (Latest Maharashtra News)

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी निवडणूक जिंकली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे राहिले होते तर तिसऱ्या क्रमांकावर माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील हे होते. यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटना या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्षही राहिले. नुकताच त्यांनी मनोज जरांगेंवर आरोप केल्यामुळं त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.

जरांगेंसोबत मराठा आंदोलनात सहभाग

मनोज जरांगे यांच्या आंदोलनातही सहभागी होते. आंदोलनातील जरांगेंचे जवळचे सहकारी म्हणूनही त्यांना ओळखलं जात होतं. जरांगेंसोबत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेवेळीही बारसकर त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी २००६ पासून आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रवचनकार ते लेखक

प्रवचनकार तसेच एक लेखक म्हणूनही बारसकर यांची ओळख आहे. त्यांनी आजवर दहापेक्षा अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधीत 'तुका सेज' हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही बारसकर यांनी लिहिलं आहे. प्रवकचनकार, लेखक यांसह शाहीर, कवी, व्याख्याते, प्रबोधनकार, शिक्षक, कायद्याचे अभ्यासक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. (Latest Marathi News)

संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना

अजय बारसकर यांनी सन 2018 मध्ये देहू इथल्या भंडारा डोंगर इथं संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा, संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात. (Marathi Tajya Batmya)

इतके गुन्हे आहेत दाखल

माय नेता डॉटइन्फोच्या माहितीनुसार, आयपीसीच्या कलमांतर्गत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल होते. यांपैकी २००५ मध्ये जाणता राजा नाटकावेळी गोंधळ झाला होता त्यासंदर्भात एक गुन्हा तर २०१४ मध्ये आचारसंहिता भंग प्रकरणी एक गुन्हा दाखल होता. सन 2006 मध्ये नागपूर आधिवेशनावेळी विधानभवनाबाहेरआंदोलन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT