Maharashtra Politics Live Updates 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics Live Updates : अजित पवारांची कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी घेतली भेट

सकाळ डिजिटल टीम

 महाराष्ट्रता पुन्हा एकदा राजकीय भुकंप पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील होत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या सर्व अपडेट्स...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांची कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी घेतली भेट

शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी घेतली अजित पवारांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर घेतली भेट.

नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा- संभाजीराजे

"स्व"त्व विसरलेली जनता "तत्व" नसलेले राजकारणी घडविते. स्वतःची शक्ती ओळखा. कुणालाही गृहीत धरू देऊ नका. नवक्रांतीची मशाल पेटवा, स्वाभिमान जागवा आणि स्वराज्य घडवा !

असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ, बंडखोर नेत्यांच्या फोटोला फासलं काळं

अजित पवार यांनी राजीनामा दिला हे पक्षाला कळवले असते तर बरे झाले असते- पाटील

अजित पवार यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला, हे पक्षाला कळवलं असतं तर बरं झालं असतं. असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

प्राजक्त तनपुरे शरद पवारांसोबत, ट्वीट करुन दिली माहिती

''वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण?'' रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...

प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहिजेच; अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

प्रत्येक बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहिजेच, असा निर्णय अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. 'देवगिरी'वरील बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षाच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती.

थोड्याच वेळात जयंत पाटलांची पत्रकार परिषद

अजित पवारांच्या बंडानंतर थोड्यात वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत.

प्रतोद म्हणून माझा व्हिप चालणार- आव्हाड

ज्या माणसाने एवढं सगळं दिलं त्या माणसाला अशा परिस्थिती आणून ठेवणं चुकीचं आहे. आता इथून पुढे आमदारांसाठी माझा व्हिप चालणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड 

पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही- शरद पवार

पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार?

  • ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.

  • देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली.

  • शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते.

  • पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही

  • आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत.

  • तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार

  • राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी

  • महाविकास आघाडी एकत्र काम करणार

  • जे घडले त्याची चिंता नाही.

शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु

अजित पवारांनी ट्वीटरच्या 'बायो'मध्ये केला 'असा' बदल

अजित पवारांनी ट्वीटरच्या 'बायो'मध्ये बदल केला असून 'डेप्युटी चिफ मिनिस्टर, महाराष्ट्र' असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी 'एनसीपी लिडर' हे कायम ठेवलं आहे.

जयंत पाटलांच्या घरी हालचालींना वेग, नेते येतायत भेटीला

जयंत पाटलांच्या घरी हालचालींना वेग. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांच्या भेटीला. अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटलांच्या भेटीला जात आहेत.

शरद पवार भूमिकेवर ठाम, महाविकास आघाडीसोबतच

शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शरद पवारांची भूमिका माहविकास आघाडी बरोबर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.

थोड्याच वेळात अजित पवारांची पत्रकार परिषद

शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर- नारायण राणे

शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर ! देवेंद्र फडणवीस यांच्‍या यॉर्करवर राष्‍ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्‍दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्‍वत:च्‍या पायात अडकून पडून रन आऊट, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचा तरुण चेहरा आदिती तटकरेंनी घेतली शपथ

धर्मराव आत्राम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दिलीप वळसे पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

अजित पवार शपथ घेत आहेत

राज्यपाल राजभवनात दाखल होत आहेत

शपथविधीसाठी राज्यपाल राजभवनात दाखल होत आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अजित पवारांपाठोपाठ शिंदे फडणवीस राजभवनात दाखल!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे राजभवन येथे आगमन झाल्यानंतर काही वेळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही मुंबईतील राजभवनात पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT