NCP Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: 'लहान तोंडी घेतो मोठा घास...', काका-पुतण्याच्या मनोमिलनासाठी कार्यकर्त्याने पुण्यात लावले बॅनर

पुण्यात पुणेरी पाट्यानंतर आता बॅनरचीही चर्चा चांगलीच रंगू लागली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यात पुणेरी पाट्यानंतर आता बॅनरचीही चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. पुणे शहर परिसरात कधी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्याच्या चर्चा अनेकदा सूरू असतात. अशातच यावेळी झळकलेला बॅनर चर्चेत आला आहे तो राष्ट्रवादीच्या फूटीवर आणि काका-पुतण्याच्या मनोलमिलन व्हावे यासाठी हा बॅनर लावण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीनिमित्त आज (शुक्रवारी) एकत्र येतील अशा चर्चा सुरू होत्या. दोन्ही नेत्यांना आवाहन करणारे हे बॅनर पुणे शहर परिसरात लावण्यात आलेले आहे.

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनोमिलनासंदर्भात हे बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बाहेरच हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवरती “लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस” असा मजकुर लिहण्यात आला आहे.

तर हा बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय घुले यांनी लावला आहे. आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दिलीप वळसे पाटील या बैठकीसाठी उपस्थित राहिले. मात्र, अजित पवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.परंतु अजित पवार यांनी या बैठकीला येण्याचं टाळलं आहे. ते बैठकीला न येता दौंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याचवेळी या बॅनरची चर्चा संपूर्ण शहरात सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: डेव्हिड वॉर्नर सोडा, १९ वर्षांचा ओपनर टीम इंडियाला घाम फोडणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑसी कोचचे संकेत

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

Latest Maharashtra News Updates Live : धौला कुआनजवळ डीटीसी इलेक्ट्रिक बसला आग

Bandra Terminus चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! Platform Ticket ची विक्री बंद, पण किती दिवसांसाठी? जाणून घ्या

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT