राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अमोल मिटकरींनी केलेलं ट्वीट चांगलंच व्हायरल झालं होतं. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा दावा मिटकरी यांनी केला होता. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर्स सुद्धा झळकले होते. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करणाऱ्यांची खरडपट्टी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्रीपद बदलाबाबत विधाने करणाऱ्या समर्थक आमदार तसेच मंत्र्यांना अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच फटकारल्याची माहीती समोर आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची अजित पवारांनी चांगलीच खरपट्टी काढल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवार आणि इतर आमदार युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिंदे-भाजप सरकारमध्ये समाविष्ट होताच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर आता मुख्यमंत्री बदलाच्या बातम्यामुळे पुन्हा शिवसेनेत नाराजी पसरल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांचे समर्थक आमदार आणि विरोधीपक्षातील नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.