Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजित पवारांना ते विधान टाळता आलं असतं', नाना पटोले असं का म्हणाले?

ठाकरेंच्या काळात आनंदाने काम केलं परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं अजित पवारांचं वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ला मुख्यमंत्रीपद मिळेल, एवढे आमदार निवडून आलेले होते. परंतु राजकारणात काही निर्णय घेतले जातात. काँग्रेसनेही त्यावेळी मानसिकता केलेली होती. परंतु दिल्लीत काय घडलं माहिती नाही. त्यावेळी आम्ही आर.आर. पाटील यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केलं होतं. परंतु तसं घडलं नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्नाचं उत्तर देताना, कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना ते विधान टाळता आलं असतं असं म्हंटलं आहे.

'नाईलाज हा शब्द वापरण्यापेक्षा तुम्ही शपथ नव्हती घ्यायची. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त केली त्यापेक्षा पदावर न बसता खदखद व्यक्त करायला हवी होती. या व्यक्तव्याची अपेक्षा आम्हाला नव्हती. प्रत्येक मुख्यमंत्री या राज्याला काही ना काही देऊन गेला. त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीच आहे. तुम्हाला तेव्हा काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं', असंही पटोले यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. २०१९ला महाविकास आघाडी झाली. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही एकत्रिपणे चांगलं काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्षे काम केलं. कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT