ajit pawar on rohit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं'', रोहित पवारांच्या 'त्या' टीकेला अजितदादांचं उत्तर

संतोष कानडे

पुणेः 'बारामती अ‍ॅग्रो'वरील कारवाईनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर आरोप केले होते. अजित पवारांनी त्या आरोपांना उत्तर देत खोचक टिपण्णीदेखील केली आहे. शिवाय त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.

पुणे दौऱ्यावर असताना अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, शुक्रवारी पुण्यात कायदा सुव्यवस्थेसंदर्भात घटना घडली होती. परंतु पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक केली. मी पालकमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रासह पुण्याकडे लक्ष ठेवावं लागतं. यासंदर्भातली सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल.

पवार पुढे म्हणाले की, पुणे मेट्रोला निधी मिळाला नाही, ही बातमी खोटी आहे. पिंपरी चिंचवडला दोन रिंगरोड करत आहोत. एक आऊटर आणि एक इनर असेल. शिवाय १२ जानेवारी रोजी पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत. ४६ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी पंतप्रधान येत आहेत.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी , ''राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या?'' असा प्रश्न उपस्थित केला. रोहित पवारांच्या दिल्लीवारीच्या आरोपांवर ते म्हणाले, तो बच्चा आहे. बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यावीत, एवढा तो मोठा नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते त्याला उत्तर देतील.

काय म्हणाले होते रोहित पवार?

'बारामती अ‍ॅग्रो'वरील कारवाईवरुन रोहित पवार म्हणाले होते की, सात-आठ दिवसांपूर्वी दिल्लीत कोण गेलं होतं? अजितदादा मित्रमंडळाचं कोण दिल्लीत गेलं? मागच्या सात दिवसात कोण कुठे गेलं? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मी चूक केली असती तर अजितदादांसोबत भाजपमध्ये जावून बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता महत्त्वाची आहे. माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. त्यांना दिलेलं काम ते करत असतात.. अशा शब्दांत रोहित पवारांनी टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT