Ajit Pawar Devgiri Bungalow Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Bungalow : सरकार बदललं, पदं बदलली, पण बंगला तोच; अजित पवारांवर सगळ्यांचंच ‘इतकं’ प्रेम का?

Maharashtra Politics Update : १९९९ मध्ये या देवगिरी बंगल्यात प्रवेश केलेले अजित पवार सत्ता आली गेली, तरी तिथंच राहिले.

वैष्णवी कारंजकर

Ajit Pawar Latest News : महाविकास आघाडी सरकार पडलं, सत्ता गेली, अजित पवारांचं पदही बदललं. आधी विरोधी पक्षनेते, आता पुन्हा नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. पण एक गोष्ट मात्र अजिबात बदलली नाही. ती गोष्ट म्हणजे अजित पवारांचं शासकीय निवासस्थान. १९९९ मध्ये या देवगिरी बंगल्यात प्रवेश केलेले अजित पवार सत्ता आली गेली, तरी तिथंच राहिले. असं का?

महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना देवगिरी हा शासकीय बंगला देण्यात आला होता. सरकार पडलं, त्यानंतर एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. या वेळी त्यांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर या नव्या सरकारने त्यांची इच्छा मान्य करत ते उपमुख्यमंत्री पदी नसतानाही त्यांना हा बंगला दिला. त्यामुळे अजित पवार आपल्या विरोधी पक्षनेते पदाच्या कार्यकाळातही देवगिरी या बंगल्यातच राहिले.

देवगिरीत प्रवेश केला आणि आजपर्यंत तिथेच....

१९९९ साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी युतीचं सरकार होतं, तेव्हा अजित पवार या देवगिरी बंगल्यात राहायला गेले. २०१४ पर्यंत ते याच बंगल्यामध्ये राहत होते. २०१४ मध्ये जेव्हा भाजपा शिवसेनेचं सरकार आलं आणि सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री झाले, तेव्हा त्यांना हा बंगला देण्यात आला होता. पण जेव्हा २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना देवगिरी बंगला पुन्हा देण्यात आला.

पुढे मविआ सरकार पडलं, शिंदे-फडणवीस सरकार आलं. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, पण तरीही शिंदे फडणवीस सरकारने अजित पवारांना हाच बंगला दिला. त्यामुळे विरोधी पक्षनेते असतानाही अजित पवार देवगिरीमध्येच राहिले.

फडणवीसही वर्षाच्या प्रेमात; बंगला सोडताना...

देवेंद्र फडणवीसांच्या सोबतही असंच झालं होतं. जेव्हा ते मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले, तेव्हा वर्षा बंगला पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाला. या बंगल्यात उद्धव ठाकरे सहपरिवार राहायला येणार होते. पण फडणवीसांना हा बंगला सोडायचा नव्हता, पण सोडावा लागला. त्यानंतर जेव्हा ठाकरे या बंगल्यात आले, तेव्हा या बंगल्याच्या भिंतीवर काहीतरी लिहिलेलं आढळलं. या लिखाणावरुन वर्षा बंगला सोडताना फडणवीस किती नाराज होते, हेच दिसत होतं, असे उल्लेख माध्यमांच्या अहवालामध्ये आढळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Politics : नीतेश राणेंविरोधात 'मविआ' कोणाला उतरविणार रिंगणात; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, 'ही' नावं चर्चेत

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच लोकांनी घेरले

Chutney Store Tips: घरी बनवलेल्या चटण्या दिर्घकाळ राहतील चांगल्या, फक्त 'या' टिप्स करा फॉलो

Aadhaar Update : आधार कार्डवरील ही माहिती कधीच बदलू नका; अपडेट करताना घ्या काळजी,नाहीतर होईल पश्चाताप

Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, निफ्टी 24,500 च्या खाली

SCROLL FOR NEXT