परभणी : शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. परभणीत बोलताना त्यांनी भाजपवर आरोप केला. मराठवाडा शिक्षक मतदार संघात १४ उमेदवार रींगणात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे.
निवडणुकीत भाजपने उमेदवार पळवल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पेन्शनबाबत भूमिकेवर त्यांनी प्रश्न निर्माण केले.
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही पेन्शन चालू करणार नाही. मात्र त्यांनी औरंगाबादच्या सभेत पलटी मारली. त्यांनी वेगळी टेप लावली. यामागे काय कारण असेल असा प्रश्न मला पडला. तर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच उमेदवारांनी सांगितले की याचा फटका निवडणुकीत बसेल. ते वक्तव्य दुरुस्त करा. त्यामुळे फडणवीसांचा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हे तुम्हीच ठरवा, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, भाजपने उमेदवार दिले असले तरी त्यांना एखादा अपवाद वगळता स्वत:चा उमेदवार मिळाला नाही. भाजपने उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतरांकडून घेऊन उमेदवार दिले.
पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांची मोठी अडचण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्या भूमिकेवरही यानिमित्ताने शंका घेतली जात आहे. दरम्यान यावर बोलण्यात अजित पवार यांनी नकार दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.