Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shambhuraj Desai: अजितदादांच्या एन्ट्रीमुळं खेळ बिघडणार? शंभुराज देसाईंचं ठाकरेंबाबत मोठं विधान

राष्ट्रवादीलासोबत घेतल्यानं शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शरद पवारांना सोडून अजित दादांच्या गटानं सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. पण यामुळं शिंदे गटात धुसफूस सुरु असल्याचं चित्र आहे. कारण यावर आता मंत्री शंभुराज देसाई यांच्या विधानानं राज्यात पुन्हा नवी घडामोड घडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. (Ajit Pawar entry in Govt will spoil the game Shambhuraj Desai big statement about Uddhav Thackeray)

शंभूराज देसाई यांनी सामटिव्हीशी बोलताना मोठं विधान केलं आहे. जर उद्धव ठाकरेंकडून साद आली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं सरकारमध्ये अजितदादांची एन्ट्री झाल्यानं शिंदे गटात नाराजी असल्याचं दिसू लागलं आहे. याद्वारे शिंदे गटाकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

देसाई म्हणाले, अद्याप आम्हाला तसा कुठलाही प्रस्ताव किंवा साद घातलेली नाही. जर त्यांनी साद घातली तर त्यांना योग्य प्रतिसाद देऊ. राजकारणातली ही नेहमीची प्रथा आहे. जर तुम्हाला कोणी साद घातली की आपण एकदम धुडकाऊन लावत नाही. आपण म्हणतो की विचार करु. पण याबाबत असा विचार करणारा मी एकटा नाही. पक्षाचे नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आहेत. बदलत्या राजकारणाचा याला संदर्भ नाही.

यापूर्वी मी स्वतः म्हटलं होत की, जेव्हा आम्ही शिंदे साहेबांसोबत महाविकास आघाडी नको म्हटलं होतं. त्यावेळी आमच्या उठावाच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद द्यावा. झालं ते झालं दोन अडीच वर्षे ते आता दुरुस्त करुयात. त्यासाठी शिवसेना भाजप अशी युती करुयात, हे मी वर्षभरापूर्वी देखील म्हटलं होतं. (Marathi Tajya Batmya)

देसाईंच्या या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सकारात्मक भूमिका बोलून दाखवली आहे. त्यांनी म्हटलं की, मी वर्षभर महाप्रबोधन यात्रेनिमित्त फिरले त्यात शंभुराज, गोगावले यांनी माझ्याबद्दल कितीही द्वेषभावनेनं बोलले तरी माझं म्हणणं होतं की, ही आमची भावंड आहेत. मला वाटतं हा पक्ष नेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT