ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री...अजित पवार गोंधळले,VIDEO

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत.

धनश्री ओतारी

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांचा गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळाले. सवयीप्रमाणे अजित पवार यांनी स्वतःचा उल्लेख आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री असा केला. मात्र, ताक्ताळ त्या शब्दत दुरूस्त करत त्यांनी 'विरोधी पक्षनेता' असा उल्लेख केला.(ajit pawar got confused by referring to himself as the deputy cm)

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपद होतं. सध्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहेत.

नेमकं घडलं काय?

दौऱ्यादरम्यान, अजित पवार यांना परमबीर सिंह वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांचं निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. यावरच उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मला त्यासंदर्भात काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी तिथे गेल्यानंतर त्याची माहिती घेईन. आज मी राज्याचा उप..असे उपमुख्यमंत्री म्हणता म्हणता थांबले अन् विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्याशी बोलतो. त्यामुळे मी पूर्ण माहिती घेऊन त्याआधारे स्टेटमेंट करेन. मी गेल्यानंतर सोमवारी त्याबद्दल माहिती घेईन." असे वक्तव्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT