AJIT PAWAR Ekanth Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयातील घटनेवरून कुरघोडी करू नये; केंद्रीयमंत्र्यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - एकनाथ शिंदे सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यातच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा होती. यावर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आली आहे.

रामदास आठवल म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयावरून एकमेकांवर कुरघोडी करू नये.

भाजपने पक्ष फोडले, भाजपने सरकार पाडलं यात काही तथ्य नाही. शरद पवार यांनी राष्ट्रहितासाठी NDA सोबत यायला हवं. मी देखील काँग्रेस, एनसीपी सोबत राहून पुन्हा NDA मध्ये आलेलो आहे. त्यामुळे पवारांनी राहुल गांधींच्या नादाला लागू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला.

कांदा निर्यात शुल्कावर आठवले म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अनेक दिवसांची मागणी आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा. आपल्या कवितेतून आठवले यांनी म्हटलं की, "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला आहे वांदा"

लोकसभा निवडणुकीबाबत आठवले म्हणाले की, आरपीआयच्या दोन जागा महायुतीमध्ये निवडून आल्या तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळेल. शिर्डीमधील लोकांची इच्छा आहे की, मी तिथून निवडणूक लढवावी. माझीही इच्छा आहेच असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

Khambatki Ghat Accident : सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात; मालट्रकने चार कार गाड्यांना उडविले

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीतला जागावाटपाचा तिढा होणार दूर? 'हा' असणार नवा प्लॅन

Manoj Jarange: ..तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो; अंतरवाली सराटीच्या मार्गावर बॅरिकेड्स लावल्याने जरांगेंचा पोलिसांना इशारा

Morning Breakfast Recipe: घरीच झटपट बनवा शिंगाड्याच्या पिठाचा पौष्टिक हलवा, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT