Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'बरं बाबा मी नाही नाक खुपसत पण..', अजित पवारांनी 'त्या' जाहिरातीवरून भाजपला काढला चिमटा

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पानभर जाहिरातींवरुन राज्यात वातावरण पेटलेलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि सबंध भाजपलाच चिमटे काढले आहेत.

अजित पवार म्हणाले की, देशात मोदी अन् राज्यात शिंदे, हे भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का? याचा खुलासा करावा. नेहमी काही झालं की लगेच चंद्रशेखर बावनकुळे खुलासा करत असतात, मलापण तुमचा खुलासा ऐकायला आवडेल.

'तुम्ही म्हणाल अजित पवारांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? बरं बाबा मी नाही नाक खुपसत. परंतु राज्यातल्या मुख्यमंत्र्यांबाबतची जाहिरात आहे आणि त्या सरकारमध्ये तुमचा पक्ष सहभागी आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत खुलासा करावा', असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, फडणवीसांपेक्षा शिंदेंना जनता अनुकूल असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हे भाजपला मान्य आहे का? शिंदेंच्या बाजूने २६ टक्क्यांचा कौल दाखवलेला आहे आणि फडणवीसांच्या बाजूने २३ टक्के कौल दाखवलेला आहे. अशा पानभर जाहिराती का द्याव्या लागल्या, हे आम्हांला माहिती नाही. परंतु जनतेला सगळं कळतं. त्यांचं त्यांनी हसू करुन घेतलं आहे.

सरकारला खरंच विश्वास असेल तर उद्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा. कुणाच्या पाठिशी किती लोक आहेत, हे लक्षात येतं; असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT