Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: ''तुम्हाला आता हसणारा अजित पवार दिसतोय ना..?'' बारामतीमध्ये अजित पवारांनी सांगितलं नव्या बदलाचं कारण

Baramati News: बारामतीतील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखीत केला. ते म्हणाले, या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण केलेली विकासकामे मोठी आहेत, त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना, अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा असे अजित पवार यांनी सांगितले.

संतोष कानडे

Political News Updates: जनसन्मान यात्रा सुरु झाल्यापासूनच कोणावरही टीका करायची नाही, कोणाविषयी काहीही बोलायचे नाही असे मी ठरवूनच टाकले आहे, मी नम्र झालो आहे, कोणावरही चिडत नाही, तुम्हाला आता हसणारा अजित पवार दिसतोय ना? अशी जाहीरपणे विचारणा करत आपण बदललो आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीकरांना जाहीरपणे सांगितले.

बारामतीतील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी आपल्यातील बदल अधोरेखीत केला. ते म्हणाले, या पुढील काळात मी कोणावरही टीका करत नाही, कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये, आपण केलेली विकासकामे मोठी आहेत, त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ, मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना, अजित पवार आता विनम्र झालेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा असे अजित पवार यांनी सांगितले.

आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेले महिलांबाबतचे विधान अयोग्य असून त्यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करावी व या पुढील काळात बोलताना काळजी घ्यावी अशा सूचना त्यांना दिल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. भुयार यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ वेगळा होता असे मला सांगितले तरी चूक ही चूकच असल्याने ती चूक दुरुस्त करण्यास त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक असेल त्या प्राधान्यक्रमाने जिल्हा नियोजन विकास निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी टप्याटप्याने निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी 35 हजार कोटींची तरतूद केलेली आहे, त्या मुळे या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झारगडवाडी येथील प्रस्तावित जनावरे बाजाराच्या 21 एकर जागेसाठी आठ कोटींची मागणी करण्यात आली होती, मात्र कॅबिनेटमध्ये चर्चा करुन ही जागा विनामूल्य बाजार समितीला मिळवून दिल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT