Ajit Pawar: राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आज महायुतीचे अनेक उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जात आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे याच्यांकडे पाहून कळतं म्हणत महायुतीला विजय करण्यास आपल्याला काम करायचं आहे म्हणत मतदारांना साद घातली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना विजय करा, पुणे, शिरूर आणि मावळमधील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा. अजून विकास करण्यासाठी आपल्याला केंद्राची मदत हवी आहे.
महायुतीला विजयी करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. विरोधक आणि मित्र कसा असावा हे विजय शिवतारे यांच्याकडे पाहून कळतं असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "ही गावकी भावकीची निवडणूक नाही. तर ही देशाची निवडणूक आहे, देशात विकास कोण करेल. पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकासकामे केली. आता आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबर आणण्यासाठी काम करत आहेत, असे म्हणत देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे".
ही निवडणूक मोदींविरुद्ध राहुल गांधी अशी आहे. उगाच भावकीची निवडणूक केली जाते आहे. ही निवडणूक देश पातळीवरची आहे. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, बनवाबनवी सुरू आहे, ऐकू नका" असा कानमंत्रही अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.