ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात उद्या मोठ्या घडामोडी; कोल्हापुरातून अजित पवार म्हणाले...

संतोष कानडे

कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये अजित पवारांनी विकासासाठी आपण सत्तेत सहभागी झाल्याचं स्पष्ट केलं. शिवाय त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलही भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. इतर समाजाला अडचण होणार नाही, याचाही विचार सरकार करत आहे.

पवार पुढे म्हणाले की, शाहू महाराजांनी त्यांच्या काळात आरक्षण दिलेलं होतं. आज मराठा समाजात ठाराविक लोकं मंत्री, आमदार, चेअरमन आहेत. परंतु मोठा वर्ग नरेगाच्या कामावर जातो, मोलमजुरी करतो, माथाडी कामगार म्हणून काम करतो. परिस्थिती वाईट आहे.

''मराठा आरक्षणासाठी मागास आयोगाचं गठण करणं गरजेचं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण दिलं होतं. नंतर देवेंद्र फडणवीसांनीही दिलं. परंतु कोर्टात टिकलं नाही. जे गरीब आहेत, अशांना आरक्षण मिळालं पाहिजे.''

अजित पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु ते समजून घेत नाहीत. ओबीसी घटकाला अडचण होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीच उद्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. इतर पक्षांना काय वाटतं? यातून मार्ग कसा काढायचा? यावर चर्चा होणार आहे. शेवटी चर्चेतूनच मार्ग निघेल, असं अजित पवार म्हणाले.

उद्या मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी घडतील, असं दिसून येतंय. मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा उद्या चौदावा दिवस असेल. त्यामुळे उद्या तरी उपोषण सुटेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT