Ajit Pawar Interview  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''साताऱ्याची जागा सोडली पण इथूनच राज्यसभेचा उमेदवार देणार'', अजित पवारांनी थेट सांगून टाकलं

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साताऱ्याच्या जागेबाबत खुलासा केला असून भाजपला जागा सोडली असली तरी राज्यसभेला साताऱ्यातलाच उमेदवार देणार असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार म्हणाले की, सातारची जागा आम्ही सोडली आहे, त्याबदल्यात आम्हला राजसभेची जागा मिळणार आहे, त्यामुळेच आम्ही आमची हक्काची जागा सोडली. राज्यसभेच्या या जागेवर आम्ही साताऱ्याचाच उमेदवार देणार आहोत. असं म्हणत त्यांनी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा थांबवली आहे.

शरद पवारांच्या भाजपबरोबर जाण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले की, किमान भाजपबरोबर जाण्याची चर्चा झाल्याचं शरद पवार आता मान्य करत आहेत. ⁠सहा-सहा मीटिंग भाजपसोबत झाल्या आहेत. जायचे नव्हते तर मीटिंग का झाल्या? ⁠कधी कधी संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते असे विधान करतात, अशी टीका त्यांनी केली.

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या शरद पवारांच्या विधानावर अजित पवार म्हणाले, ⁠मला वाटत नाही उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.⁠ पवारांना जे वाटतं तेच ते करतात आणि चर्चा सामूहिक झाल्याचं दाखवतात, असाही टोला त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटलांचं विधान चुकीचं- अजित पवार

शरद पवारांचा पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट, या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका, आम्ही पाहातो.. त्यानंतर ते शांत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT