Ajit Pawar Likely To Form Third Front In Maharashtra Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: विधानसभेच्या तोंडावर अजित पवार टाकणार मोठा डाव! 'या' पक्षांना बरोबर घेत स्थापन करणार तिसरी आघाडी?

Third Front In Maharashtra: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर असतानाही भाजपला मोठा फटका बसला होता.

आशुतोष मसगौंडे

राज्यात येत्या दोन ते तीन महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहे. सध्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत खूश नसल्याचे दिसत आहे. कारण अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली करत असल्याची माहीती सूत्रांच्या हवाल्याने साम टीव्हीने दिली आहे.

अजित पवार यांच्या या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सारख्या छोट्या पक्षांचा समावेश असू शकतो. जर भविष्यात ही आघाडी स्थापन झाली तर राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळणार आहे या शंका नाही.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर असतानाही भाजपला मोठा फटका बसला होता. यानंतर अजित पवारांना बरोबर घेतल्याने महायुतीचे नुकसान झाले अशी टीका अनेकांनी केली होती.

आता लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी भाजपने अजित पवार यांच्यासमोर बंच्चू कडू, वंचित आघाडी आणि एमआयएमला बरोबर घेत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय दिला आहे. जर ही आघाडी निर्माण झाली तर याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

'एमआयएम'ची भूमिका

राज्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत बोलताना एमआयएमचे नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "राज्यात तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण याबाबत आम्हाला अजून कोणतीही कल्पना नाही. याबाबच प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही. पण जर असा प्रस्ताव घेऊन कोण आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू."

जरांगे पाटीलही तयारीला

दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मोनोज जरांगे पाटील यांनीही नुकतेच, "मराठा, धनगर, दलित आणि लिंगायत समाजाने एकत्र यायला पाहिजे. आपण सर्व एकत्र आलो तर सरकारला दणका देत सत्ता परिवर्तन करू शकतो. असे झाले तर प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला आणि गोरगरिबांना न्याय मिळेल" असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT