मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीतून फुटून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्री अजित पवार यांची भेट घेत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमाआधी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासहित आमदार आणि मंत्री वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला गेले होते.
त्यानंतर आजही अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर हे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय आहे याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. आजच्या या भेटीनंतर मात्र शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी वाय बी सेंटरवर पोस्टरबाजी केली आहे.
"ED चा धाक, शरद पवार बाप, मोदी वॉशिंग पावडर" अशा आशयाचे पोस्टर घेत काही कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. तर भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. सध्या या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली असून शरद पवार अजित पवार गटातील आमदारांची मागणी मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
"पक्ष एकसंध राहावा यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. पक्षामध्ये कुठलीही फूट पडली नाही, असं आम्ही आमचं म्हणणं शरद पवार यांच्यापुढे मांडलं आहे, त्यांनीही आमचं बोलणं ऐकून घेतलं पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही" असं प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.