Ajit Pawar NCP 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP: देवेंद्र फडणवीसांचं ‘ऑपरेशन राष्ट्रवादी’, ‘कन्फर्म लिस्ट’ येताच हिरवा कंदील

मृणालीनी नानिवडेकर

Ajit Pawar Nationalist Congress Party MLA Maharashtra Politics

मुंबई : “महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या निकालानंतरच्या सत्तासमीकरणांना यशस्वीरित्या उत्तर देण्यासाठी आम्ही सुरु ठेवलेल्या प्रयत्नांना रविवारी अखेर दुसरे यश मिळाले”….... अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची ही प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या बंडाला एक वर्ष लोटला असतानाच फडणवीसांच्या दुसऱ्या बाऊन्सरमुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस घायाळ झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही दुसरी मोठी उलथापालथ नेमकी कोणामुळे घडली, यासाठी कधीपासून तयारी सुरू होती, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

१.      सहा दिवसांपूर्वीच ऑपरेशन ‘राष्ट्रवादी’ फायनल स्टेजमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सुरू होती. शरद पवार आणि खुद्द अजित पवारांनीही नाराजीचे वृत्त फेटाळून लावले. मात्र, पडद्यामागे अजित पवार गोटातून हालचाली सुरू होत्या. सहा दिवसांपूर्वी अमित शाहांच्या संमतीनंतर ‘ऑपरेशन राष्ट्रवादी’चा शेवटचा अंक सुरू झाला.

२. आमदारांची लिस्ट ‘कन्फर्म’ झाली आणि...

अजित पवार यांनी 2019 मध्येही देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ता स्थापनेचा प्रयोग केला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये अजित पवारांचं बंड फसलं आणि देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. यावेळी 2019 ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती. अजित पवारांकडे ४० विधानसभेतील ४० आणि ९ विधान परिषदेच्या आमदारांचा पाठिंबा असल्याची यादी तयार होती. ही नावं ‘कन्फर्म’ झाल्यावरच फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

३.  चार दिवसांपूर्वी CM एकनाथ शिंदेंना ‘ऑपरेशन राष्ट्रवादी’ची कल्पना

अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या NCP MLA ची यादी तयार झाल्यावर फडणवीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वासात घेणे आवश्यक होते. चार दिवसांपूर्वी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना ‘ऑपरेशन राष्ट्रवादी’ची कल्पना देण्यात आली. शुक्रवारीच अजित पवारांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा तयार केला केला होता, अशी माहितीही आता समोर येत आहे.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे अजित पवारांनी सांगितले. खातेवाटपाबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही असे स्पष्ट करतानाच विकासासाठी भाजपाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता. आज मोदींच्या या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.  ही गुगली नाही, तर ‘रॉबरी’ असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. पक्षाचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावरही ‘शरद पवार’ असे उत्तर त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT