Ajit Pawar NCP Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् आव्हाडांवर कारवाई; नार्वेकरांना दिले पत्र

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असून एकमेकांवरील कारवाईचे सत्र सुरू झाले आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : अजित पवार आणि प्रमुख नेते राष्ट्रवादीसोबत बंड करून भाजप शिंदे सरकारला सामील झाले आहेत. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबत ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असून एकमेकांवरील कारवाईचे सत्र सुरू झाले आहे.

काल अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार गटाने या मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून यासंबंधीत पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

त्यानंतर अजित पवार गटाकडून आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचा आणि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त निर्णय घेण्यात आला आहे. तर शरद पवार गटाने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबीत करण्यात आले आहे.

विरोधीपक्षनेत्याची निवड ही विधानसभा अध्यक्षांकडून केली जाते. ज्या विरोधीपक्षाकडे जास्त आमदार असतात त्यांचा विरोधीपक्षनेता होतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं म्हणत त्यांच्या अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. तर जयंत पाटील यांना पदमुक्त करत असल्याची घोषणा करत अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदी आणि अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आले आहेत.

"आमच्याकडे आमदारांची संख्या नसती तर कालचा शपथविधी झाला नसता" असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. त्याचबरोबर, कुठलाही वाद व्हावा अशी आमची इच्छा नाही, पक्ष कुणाचा हा निर्णय निवडणूक आयोग घेईल असंही ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge Video : प्रियंका गांधी अर्ज दाखल करताना खर्गे दाराबाहेर उभे? दलितांचा अपमान झाल्याचा भाजपचा आरोप

Samsung Galaxy Smart Ring : सॅमसंग गॅलेक्सी रिंग झाली लाँच; फॅशन-तंत्रज्ञानाचा अनोखा संगम,किंमत अन् फीचर्स पाहा

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: सुप्रिया सुळेंनी केलं हर्षवर्धन पाटलांचं औक्षण

Kalyan Gramin Assembly Constituency: मनसेचे राजू पाटील वाचवणार का आपली जागा? की उद्धव ठाकरे देणार धक्का?

Kolhapur Politics : कोल्हापूर शहराचे पहिले आमदार कोण? 'या' चिन्हावर मिळवला होता विजय, अनेक संकटांवर केली होती मात

SCROLL FOR NEXT