Ajit pawar NCP Crisis chhagan Bhujbal opponent Manikrao Shinde meets Sharad Pawar politics  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar NCP Crisis : नवी बांधणी सुरू, भुजबळांचे कट्टर विरोधक शरद पवारांच्या भेटीला…; करेक्ट कार्यक्रम होणार

रोहित कणसे

राज्याच्या राजकारणत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी मुंबईत नेते कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवल्या आहेत.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी पुन्हा पक्ष उभारणीला सुरूवात केली आहे. त्यांनी काल संपूर्ण राज्य पिंजून काढण्याची घोषणा देखील केली आहे. शरद पवार शिवनेरी येथून त्यांच्या दौऱ्याची सुरूवात करणार आहेत. यादरम्यान अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक मात्र शरद पवारांच्या गोटात सामिल झाल्याचं पाहायला मिळालं.

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवार गटात गेल्यावर त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माणिकराव शिंदे शरद पवार यांचे भेटीला पोहचले आहेत.

काही काळापूर्वी भुजभळांना विरोध करणाऱ्या माणिकराव शिंदे यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणुकीत काम केल्याचा ठपका ठेवत शिंदे यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. मात्र आज ते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने नवीन चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन बडे नेते शरद पवार आणि अजित पवार आणने-सामने उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही नेत्यांकडून आज (ता.५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणाकडे किती आमदार असणार हे स्पष्ट होणार आहे. या बैठकीसाठी दोन्ही गटांकडून व्हीप बजावण्यात आला असून दोन नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत आणदार मात्र कात्रीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT