महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी, पुढेही पक्षाच्या चिन्हावरच लढणार'' पवार म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, मजबुतीने मोदी साहेब देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला आणि राज्याला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि आज सरकारला पाठिंबा दिला.

इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, आजपर्यंत सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं पक्ष वाढण्यासाठी अनेक जणांची मदत केली आहे. यापुढील काळात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. तो प्रयत्न असणार आहे.

''भुजबळ साहेब आता बरोबर आहेत. आम्हाला काही टीका टिप्पणीचे वाटत नाही. महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर आहे. त्याचा विकास करायचा आहे. प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणूका असोत पक्षाचं घड्याळ चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार आहोत.''

पवार पुढे म्हणाले, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मंत्रीमंडळात सहभागी झालो आहोत. नागालँड मध्ये काय झालं होतं काही दिवसांपूर्वी हे आपल्याला माहिती आहे. आम्ही साडेतीन वर्षांपासून जो निर्णय घेतला त्यात आम्ही सगळ्यांनी मिळून काम केले आहे. आम्हाला जातीयवादी म्हणू नका. आम्ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन काम करतो आहोत.

स्वातंत्र्यापासून एकाच्या नेतृत्वावर देश पुढे गेला आहे. खिचडी सरकार जास्त चाललं नाही. खूप वर्षानंतर १९८४ नंतर देशात एका नेत्याच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे, असं कधी झालं नाही. मोदी परदेशात देखील लोकप्रिय आहेत, असं अजित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Campa: कोका-कोला आणि पेप्सी आता 10 रुपयांना मिळणार? मुकेश अंबानींच्या मास्टरस्ट्रोकने उडाली कंपन्यांची झोप

Latest Maharashtra News Updates live : समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभेतून घेतला उमेदवारी अर्ज

रणवीर- दीपिकाने लेकीला भेट दिली कोट्यवधींची रेंज रोव्हर; पण गाडीचा नंबर ६९६९ च का? वाचा कारण

IND vs NZ 2nd Test : अरे, नेट बॉलरही त्रिफळा उडवतोय! Virat Kohli ची विकेट पाहून चाहते चिंतीत, Video

Barshi Politics : बार्शीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीतच लढत; कोणाचं पारडं जड, राऊत की सोपल?

SCROLL FOR NEXT