Ajit Pawar NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : महाराष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर राजकीय भूकंपांची माळ

महाराष्ट्रात २०१९ ची निवडणूक झाल्यावर एकापाठोपाठ सतत राजकीय भूकंप अनुभवायला मिळाले.

धनश्री भावसार-बगाडे

Maharashtra Politics : गेल्या पाच वर्षात म्हणजे २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांना तोंडा बोटं घालायला लावतील अशा अनेपेक्षित घटना सतत घडत असल्याचं दिसून येत आहे. आज २ जुलै २०१३ ला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेना भाजप युती सरकारसोबत राष्ट्रवादीचे अजित पवार आणि अन्य मातब्बर नेत्यांनी शपथ घेतली.

यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. पण हा धक्का मराठी माणसासाठी नवा नाही असं म्हणायला हरकत नाही.

स्थीर सरकार?

महाराष्ट्रात स्थीर सरकार ही संकल्पना जणू २०१९ च्या निवडणूकीनंतर बदलल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या निवडणूकीत सर्वाधिक मते भाजप सरकारला मिळूनही मात्र भाजपचं सरकार स्थापन झालं नाही. तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पण तेही सरकार फार काळ टिकले नाही. तेही अनपेक्षित पण पडले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वपूर्ण मोठे नेते या सरकारला जाऊन मिळाले आहेत.

घटना क्रम

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार अनेकदा स्थापन झाले. तसे सरकार २०१४ मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केले.

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत यांच्यात अनेक वाद समोर येत होते पण एकत्रच सराकार स्थापन होईल असे बोलले जात होते. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या मतानुसार सहजच हे सरकार स्थापन होईल असे चित्र होते. पण तसे प्रत्यक्षात झाले नाही.

यावेळी विरुद्ध विचार सरणीचे पक्ष फक्त सत्तेसाठी आणि सरकार स्थापनेसाठी एकत्र आले आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणात हो पहिला मोठा भूकंप आला.

पण हे सरकार स्थापन होण्याआधीच पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्या सह अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि अचानक हे सरकार स्थापन झाल्याची घोषणा झाली. पण नंतर अजित पवार यांनी माघार घेतल्याने फक्त ८० तासातच हे सरकार कोसळलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

नंतर एकनाथ शिंदे हे अचानक ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आणि भाजप सोबत युती सरकार स्थापन केले. पण शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी बाहेर पडणे हा शिवसेनेसाठी आणि एकूण महाराष्ट्रातल्या राजणारातला मोठी भूकंप होता.

त्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि २०२२ मध्ये शिंदे, फडणवीस यांच्या युती सरकारची स्थापना झाली. यात शिंदे मुख्यमंत्री अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले.

यानंतर शिवसेना पक्ष नाव लावण्यावरूनही मोठाच वाद महाराष्ट्रात रंगला. शिंदे गट आणि ठाकरे गटात चाललेली ही लढाई महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारेच होते.

अशीच खळबळ आज २ जुलै २०२३ ला उडाली आहे. कारण पुन्हा अजित पवार फडणवीसांसोबत गेले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते त्यांच्यासह या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे यापुढेही अजून अनेक राजकीय नाट्य महाराष्ट्राला बघायला मिळणार असे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT